टक्कल
टक्कल करण्याचे फायदे व तोटे : -आरश्यासमोर सारखे न्याहाळण्याचा वेळ कमी होतो. -डोकं एकदम हलकं होतं. -केस नसल्याने डोक्याचा सूर्यासोबत डायरेक्ट संपर्क येतो व डोकं तापते. -टोपीचा खर्च वाढतो व तीची काळजी लागून राहते. -सलूनमध्ये कटींगचा किमान दोन-तीन महिन्यांचा खर्च कमी म्हणजे शून्य इतका होतो. -कटींग साठी नंबर लावावे लागतात तो वेळ वाचतो.तिथे नंबर असल्यास गप्पा मारताना होणा-या चहापाण्याचा खर्च पण कमी होतो.पण गल्ली ते दिल्ली चे analysis लवकर मिळत नाहीत. -केसांसाठीचा तेल,कंगवा,कंडीशनर, शाम्पू,साबण,जेल,डाय इ.खर्चात खूप मोठी बचत होते. -सासरवाडीला न जाण्यासाठी हे एक उत्तम कारण देता येते. -बायकांना आपल्या टकल्या नव-याला तरुण मुली आणि बायांची 'नजर' लागणार नाही,म्हणून निश्चिंत राहतात,तर टकल्यामुळे मुली -बाया पटायचे राहूद्या ढूंकून पण पाहणार नाहीत, याचे टेन्शन तमाम पुरुषांना असते. -चेहरा धुताना तो टकल्यावरुन मानेपर्यंत धूत आणावा लागतो. -मच्छरांना चावण्यासाठी एक नविन निर्धोक प्लॅटफाॅर्म मिळतो. -स्वतःच्या टकल्यावर तबला वाजवण्याचा फील घेता येतो व दुस-यांनाही देता येतो. -खिशात कंगवा ठेवण्याची ग...