सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India (दिवस दुसरा)
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व इंदौर 26/10/2019 -दिवस दुसरा आज सकाळी 9.30 ला उठलो.फक्त 4 तास झोप झाली. तितकी पुरेशी नव्हती पण गरजेची होतीच. बाकी दोघांना पण उठवले.निवांत आवरले व समोर असलेल्या एका हाॅटेलमध्ये नाश्ता करायला गेलो.इकडे इंदोरी पोहा फेमस आहे ऐकले होते.मग पोहेच ऑर्डर केले. इथे पहिल्यांदाच पोह्यामध्ये बडीशेप पाहिली.अजून कसला तरी फ्लेवर असावा पण; ओळखता आला नाही.छान होते चवीला.आवडलं. तसं पाहायला गेलं तर पाककलेतील कांदापोहे ह्या पदार्थावर सगळ्यात जास्त प्रयोग होत असलेले दिसून येतात.नाव कांदापोहे पण हल्ली काळानुसार त्यात बटाटा,मटार इ दिसून येतंच. आधी पोटोबा मग विठोबा,ह्या न्यायाने पोट भरुन घेतले व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगकडे जाणा-या गाडीत बसलो.(आतापर्यंत घृष्णेश्वर,त्र्यंबकेश्वर,भीमाशंकर ही ज्योतिर्लिंगे झालीत.ह्या सहलीत अजून दोन होतील.) गाडी रिकामीच.पण वेळेवर निघाली.लेडीजसाठी उजव्या बाजूच्या सीट्स राखीव होत्या व हे कंडक्टर पुरुषांना उठवून लेडीजसाठी जागा करुन देत होते. एका गाडीत 2-3 कंडक्टर(क्लिनर) दिसत होते(कसं काय परवडत असेल काय माहित राव?) ह्यांचा आपल्यासा...