रायगड जिल्हा दर्शन मोहिम:दिवस चौथा


सकाळी नाश्ता करुन निघालो.काल रात्री ज्या रस्त्याने जीव मुठीत धरुन प्रवास केला, आज तो रस्ता संपू नये असे वाटत होतं.खड्डा नाही,दोन्ही बाजूने जंगल,रस्त्यावर अधूनमधून आलेली सावली,वळणदार रस्ते,वाहनांची वर्दळ नाही.
श्रीवर्धनला पोचलो.इतिहासातील माझे आवडते व्यक्तीमत्व शूरवीर श्रीमंत पेशवे बाजीराव पेशवे यांच्या मूळ निवासस्थानी गेलो. इथे श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन निघालो.
पेशवे सरकारांचे मूळ स्थान

जवळच असलेल्या मंदीरात पाया पडलो.ग्रामदैवताच्या पाया पडलो व बीचकडे निघालो.वाटेत जाताना सुपारी संशोधन केंद्र दिसले.म्हटले पाहूयात काय करतात ते.आत गेलो,तिथे महालदार सर होते.त्यांना सांगीतले की फिरायलो आलोय इकडे आणि आता सुपारीबदल माहिती हवीये.मग मी प्रश्न विचारायचो ते उत्तर द्यायचे.त्यांचे उत्तर संपेपर्यंत माझा प्रश्न तयारच असायचा.20मिनिटांत खूप छान माहिती मिळाली.मग त्यांची परवानगी घेऊन परिसर पाहायला गेलो.अननसाचे झाड मी 7वी ला असताना स्वतः लावलेलं त्यावर आज पाहत होतो.मित्र तर पहिल्यांदाच पाहत होता.सुपारीच्या वाडीत आंतरपिकांवर पण संशोधन चालू होतं.फोटो घेऊन निघालो.

बीचवर गेलो.आज ढगाळ वातावरण नसल्यामुळे बीच निळसर दिसत होता.मागचे तीन दिवस पाहिलेले बीच राखाडी रंगाचे होते.5-10मिनिटांनी काढता पाय घेतला.मार्केटमध्ये एक फेरी मारुन श्रीवधन सोडले.
आता हरेहरेश्वरच्या दिशेने निघालो.गाडी पार्क करुन मंदीराकडे निघालो.मंदीराबाहेर हातपाय धूवून दर्शन रांगेत उभे राहिलो.10-15 मिनिटांत दर्शन झाले.प्रदक्षिणा करायची होती पण भरती असल्याने जाता आले नाही.
 माघारी जाताना रानमेव्यापासून बनवलेले बरेच पदार्थ घेतले.लिंबू सबरत प्यायलो.गाडीला पण Energy drink दिले व बागमांडल्याकडे निघालो.तिथून पुन्हा जेट्टीने प्रवास करुन वेशवीला आलो.उतरल्यावर बाणकोटच्या किल्ल्याबदल चौकशी केली.गाडी सरळ प्रवेशद्वारावर आली.आत जांभा खडक फोडण्याचे काम चालू होते.40मिनिटांत किल्ला पाहून झाला.बाणकोटची खाडी सावित्री नदीवर आहे व ही नदी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांची सीमा बनवते.म्हणजे आम्ही आता सीमोल्लंघन करुन (मंडणगड तालुका)रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला होता.
बाणकोटची खाडी

एकाला विचारले केळशीला कसं जायचे ते.तो म्हणला असं वरुनच जावा.वरचा रस्ता खालीच येतो.
आता आम्ही केळशीच्या दिशेने कूच केले.वर सगळीकडे माळरान होते.रस्ता पण इतका खास नाही.वाटेत साधं कुत्रंपण नव्हते.दिशादर्शक फलक पण नाहीत.रस्त्याला फाटे फुटल्यावर पंचाईत व्हायची.असाच एक Wrong Turn घेतला. पुढे जाऊन पाहतो तर मातीचा रस्ता.तिथून तसंच खाली आलो आणि एका रस्त्याला लागलो.बहुतेक हाच केळशीचा रस्ता होता.केळशीचा बीच पाहिला पण इतका स्वच्छ नव्हता.सुरुच्या बेटांमुळे सौंदर्य टिकून होते.
उटंबरपासून पुढे आलो.आंजर्ल्याकडे जाताना डाव्या हाताला एक परशुराम मंदीर पाहिले.
पुढे येऊन आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती पाहिला.नाश्ता केला. तसंच बीचवर गेलो.लोक सकाळ-संध्याकाळचे बीचवर जातात आम्ही दुपारच्या वेळेत पण जात होतो.
आंजर्ल्याचा बीच
हर्णे गावात पोचलो.लिलाव संपला होता.मासे घ्यायला गेलो. इथल्या मावश्या खूप आग्रह करतात.250रुपयाचे पापलेट  व 50रुपयांची कोळंबी घेतली.तिथल्याच एका मावशीने एक हाॅटेल दाखवले व ती बाई मासे बनवून देईल असं सांगीतले.तिने प्रति प्लेट 150रु सांगीतले व त्यात अनलिमिटेड भात भाकरी मिळेल असं सांगीतले.जेवण होईपर्यंत आम्ही किल्ला पाहून येतो असं सांगीतले.
गोवा गड पाहिला.सुवर्णदुर्ग राहिलाच. हर्णे सारख्या प्रसिद्ध ठिकाणी किल्ल्याची दुरावस्था पाहवत नव्हती.
दारुच्या बाटल्या,प्लॅस्टीकचा ढीग
जागोजागी होत्या.तिथून कणकदुर्गावर आलो व काळोख पडला म्हणून हाॅटेलवर आलो.10मिनिटांच्या वेटींग नंतर जेवण वाढण्यात आले.
पापलेट असा भाजला होता की काट्यांसकट खाल्ला.
कोळंबीचा रस्सा तर भारीच. जेवण उरकले,पैसे दिले व दापोलीकडे निघालो. दापोलीत फुकटात राहण्याची सोय  म्हणजे विद्यापीठाचे किसान भवन.पण पाण्याची समस्या सांगून त्यांनी हाकलले.मग एक-दोन रिक्षावाल्यांना विचारले स्वस्तात राहायची सोय कुठे होईल?
लक्ष्मी लाॅज व उसी लाॅज उत्तर आले.लक्ष्मी लाॅज फुल होते.मग उसी लाॅजवर गेलो.550रुपयांत चांगली रुम मिळाली.(2019 च्या जून महिन्यात पण इथेच मुक्काम केला) आज खूप दमायला झालं.मस्त फ्रेश झालो व झोपी गेलो.

आजचा खर्च
Petrol 260
Limbu pani 20
Ranmeva 150
Bankot jetty 62
Anjrle gnpti 110
Harnai 600
Room 550
20 pani



Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी