Posts

Showing posts from May, 2020

युनिव्हर्सिटी टाॅपर

Image
                  एप्रिल 2014 मध्ये माझा जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर(रायगड) मधील मित्र मोहन त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेला. त्याला म्हटले," अरे लग्नाला येता नाही येणार,M.A चा पेपर आहे नेमका त्या दिवशी." पण त्याच्या त्या पुढील वाक्याने मला लग्नाला जाण्यासाठी विवश(मजबूर,हतबल,प्रोत्साहित,अनिवार्य,) केलं. तो म्हणाला,"ते तसलं काही सांगू नकोस.साल्या, त्या एका पेपरमुळे तू काय "युनिव्हर्सिटीमध्ये टाॅप" नाही येणारेस.गप लग्नाला ये" (बघीतलंत, भावाचा माझ्यावर किती आत्मविश्वास(प्रेम) होता ते???त्यामुळेच तर पेपरला दांडी मारावी लागली.शिवाय लग्न वेळेत मिळाले नाही ती गंमत वेगळीच. पुढच्या वर्षी तो पेपर दिला व M.A  पूर्ण केलं.पण त्याचे हे शब्द माझ्या आठवणींच्या पेपरवर कायमचे उतरवले गेलेत.) मोहनच्या लग्नाला आज 6 वर्षे झाली. त्यामुळे आठवण ताजी झाली.

नकारात्मकता

नकारात्मक राहण्याचा एक फायदा असा की,तिथे अपेक्षाभंगाचे दुःख तितके जास्त नसते. अर्थात हे प्रमाण सकारात्मकता 99:1नकारात्मकता असे असावे. "येह तो होना ही था !"हे शब्द आपल्याला मोलाचा आधार देतात.

तीन वाटी पोहे व दहिवडीची ट्रेनिंग( 2016)

तीन वाटी पोहे व दहिवडीची ट्रेनिंग( 2016)              माझ्या दृष्टीने शेळीपालन,दूध व्यवसाय इ.शेतीपूरक व्यवसाय शाश्वत आहेत.त्यातल्या त्यात शेळीपालन मला बेस्ट वाटते.लोक काय मटण खायचे सोडणार आहेत का? नाही ना.मग सुरुवातीला 5-6 गोट फार्मला भेटी दिल्या.आपण B.Sc शिकलोय म्हणजे ह्यांच्यापेक्षा नक्कीच चांगला व्यवसाय-व्यवस्थापन करु शकतो, असा आत्मविश्वास आला. शेळीपालनचे सरकारमान्य ट्रेनिंग घ्यायचे ठरले.जोडीला अमोल व नितेश होतेच. मग ऑनलाईन माहिती घेतली .दहीवडीला  येणा-या  एप्रिलमध्ये 11-12-13 तारखेला प्रशिक्षण कालावधी होता. तिकडेच जाऊन सर्व फी व कागदपत्रे द्यायची होती. फलटणला मित्र रोहनच्या घरी दोन दिवस राहायची सोय होणार होती.कारण तिघांचा दोन दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च पाहिला असता दोन दिवस फलटण-दहिवडी-फलटण प्रवास करायला दोन बाईकना आरामात परवडण्यासारखे होते. प्रयाणाचा मूहूर्त ठरला 11 तारखेला सकाळी 6 पर्यंत निघायचे.कारण ट्रेनिंगची वेळ 10पासून सुरु होती व आम्हाला 165किमी तीन तासात करायचे होते.शिवाय कार्यालयीन शिष्टाचार आटोपण्यासाठी लवकर पोचणे गरजेचे होतं....