युनिव्हर्सिटी टाॅपर
एप्रिल 2014 मध्ये माझा जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर(रायगड) मधील मित्र मोहन त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेला.
त्याला म्हटले," अरे लग्नाला येता नाही येणार,M.A चा पेपर आहे नेमका त्या दिवशी."
पण त्याच्या त्या पुढील वाक्याने मला लग्नाला जाण्यासाठी विवश(मजबूर,हतबल,प्रोत्साहित,अनिवार्य,) केलं.
तो म्हणाला,"ते तसलं काही सांगू नकोस.साल्या, त्या एका पेपरमुळे तू काय "युनिव्हर्सिटीमध्ये टाॅप" नाही येणारेस.गप लग्नाला ये"
(बघीतलंत, भावाचा माझ्यावर किती आत्मविश्वास(प्रेम) होता ते???त्यामुळेच तर पेपरला दांडी मारावी लागली.शिवाय लग्न वेळेत मिळाले नाही ती गंमत वेगळीच.
पुढच्या वर्षी तो पेपर दिला व M.A पूर्ण केलं.पण त्याचे हे शब्द माझ्या आठवणींच्या पेपरवर कायमचे उतरवले गेलेत.)
मोहनच्या लग्नाला आज 6 वर्षे झाली.
त्यामुळे आठवण ताजी झाली.
Comments
Post a Comment