Posts

Showing posts from June, 2020

उत्पत्ती एका शब्दाची

उत्पत्ती: एका शब्दाची  माझा जन्म 90च्या दशकातला. त्यामुळे आमच्या इंग्रजीला Johny johny,Baba blackship अशाच कवितांपासून सुरुवात झालेली.मला आठंवतंय की,मी प्राथमिक शाळेत ४थीला होतो तेव्हापासून आम्हाला इंग्रजी भाषा अभ्यासक्रमात आली.५वीला असताना हायस्कूलमध्ये प्रवेश झाला.तिथे आम्हाला गणित विषयाचे कांबळे सर काहीच दिवसांसाठी इंग्रजी शिकवायला होते.त्यांचा स्पेलिंग पाठ करवून घेण्यावर चांगलाच जोर होता.  फक्त Conversation ची स्पेलिंग येत नव्हती म्हणून विनय व कणाद सोडून(टाटा इंग्लिश स्कूल,भिरा मधून आलेले)माझ्यासकट सर्वांनी 2-3 वेळा मार खाल्लेला.तेव्हापासून ठरवले की इंग्लिश सुधरवायचेच.त्यानंतर इंग्लिश सुधारण्यावर इतके कष्ट घेतले की १०वी पर्यंत इंग्लिश विषयामध्ये साधं घटक चाचणीला पण मी कोणालाही माझ्यापुढे जाऊ दिलेलं आठवत नाही.अर्थात माझ्या इंग्लिश सुधारणेचं श्रेय मी कांबळे सरांनाच देत आहे. अशाच एका सुधारणेचा एक भाग म्हणजे ७वी-८वी ला असेन मी,तेव्हा नम्रताताईकडे इंग्रजीच्या शिकवणीला जायचो.सोबत कणाद पण असायचा. एकदा ताईने Letter Writing साठी विषय दिला की,"तुम्हाला तुमच्या  भावाच्या साखरपुड...