रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी
At Bhaje Caves
karla caves &Ekvira aai templeLohagad Vinchukata machi
Lohgad Dudhivare Khindएप्रिलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली व 13 मे 2018च्या combine परीक्षेनंतर Chillaxing साठी 4_5 दिवसांसाठी कुठेतरी जायचे असं ठरलं;पण नक्की कुठे जायचं ह्यातच 10-15 निघून गेले.अर्थात माझ्यापुरताच प्लॅन होता हा.शेवटी असं ठरवलं की आपण वर्षातून दोनवेळा मस्त मन भरेस्तोवर फिरायचे.ह्यात भारतातील कोणतेही एक राज्य दिवाळीच्या सुट्टीत आणि महाराष्ट्रातील एक जिल्हा एप्रिलमध्ये or viceversa.जास्त पैसे नव्हते त्यात पुण्यात अभ्यासासाठी राहायला आलतो.त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा दर्शन करायचं ठरलं;ते पण लाल परीसोबत अन अधिमधी टमटम वगैरे जे मिळेल त्याने मजल मारायची ठरवली.
मुरुड तालुका सोडून इतर ठिकाणी काम-लग्न कार्यानिमित्त येणं-जाणं झालेलं(फिरणं नाही) आणि बरेचसे नातेवाईक पण जिल्ह्यात आहेत.तेवढीच फुकटात राहायची खायची सोय होईल,अडिअडचणीला पैसे पण मागता येतील हा एक उद्देश.असं बोंबलत फिरायला ते पण 4_5 दिवसासाठी कधी गेलो नव्हतो.कसलाच अनुभव नाही. त्यामुळे
Trial & Error व Security ह्या निकषांवर
ब-यापैकी ओळखीच्या असलेल्या ह्या रायगड जिल्ह्यात बोंबलत भटकायला हरकत नाही अशा समजुतीसह प्लॅन तयार केला. गुगलची मदत घेतली व स्पाॅट फिक्स केले.प्रयाणाचा मूहूर्त पण फिक्स केला 15 मे 2018 .
निश्चिंत झालो. (3/4 मे)स्पाॅट फिक्स केले आणि त्या दुस-याच दिवशी सकाळी 7.20ला देडे सरांचा काॅल आला म्हणाले,"फिरायला जायचे का?"
मी-आता परीक्षा आहे ती झाली की 15मे ला कोकणात 5_6 दिवसासाठी जाणार आहे तुम्ही येत असाल तर जाऊ सोबत.
ते-हो चालेल.पण बाईकने का?
मी-नाही.ST ने.
ते-काही हरकत नाही.भेटून प्लॅन सांगा."
मग भेटल्यावर सविस्तर सांगीतले आणि बाईकने प्रवास करायचा असं ठरले.
13ला पेपर दिला.नितेशच्या लग्नाला गेलो.सोबत रोहन गुरुजी पण होते त्यांना फिरवायचं होतं. मग त्या रात्री घरी जेवण करुन आम्ही संस्थेच्या सुतारवाडी केंद्रावर मुक्कामी गेलो.दोन फटफट्यांवर देडे सर योगेश कोलवणकर रोहन बावकर गुरुजी व मी असे चौघे 14 च्या सकाळी 9वाजता निघालो.आजची सहल म्हणजे रायगड जिल्हा दर्शनाची Trial समजत होतो.
दुधिवरे खिंडित वडापाव-बिस्कीटचा नाश्ता केला व लोहगड गाठला.योगेश सारखा फोटोग्राफर सोबत असल्यामुळे यथेच्छ फोटोशूट केलं.
3 तासात किल्ला फिरुन उतरलो.प्रत्येकी दोन ताक-सरबत मारुन भाजे लेण्यांकडे मोर्चा वळवला.मे च्या कडक उन्हात तेवढ्याशा
पाय-या चढायला जीवावर आलेलं.मी माझ्या आयुष्यातील पहिली लेणी पाहत होतो.शब्दच नाहीत वर्णन करायला.इथेही फोनच्या
कॅमे-याला सुट्टी मिळाली नाही.मग कार्ला लेणींकडे आगेकूच सुरु ठेवली.गाड्या पार्क केल्या व तिथल्या एका दुकानदार काकांना विचारले कसं जायचे ते.त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीने आमची तर दाणादाण उडाली.ते म्हणले," आता 6 वाजता कोणालाही आत सोडणार नाहीत."
मी-किती वेळ लागतो चढायला?
काका-20मिनिटे.तुम्ही तरुण रक्ताचे 10-15मिनटात जाल.
घड्याळ्यात पाहिले तर 5.50.
मग काय सगळे जवळपास पळतच निघालो.
लोहगड-भाजे लेणी चढून उतरुन पायातले त्राण गेलतंच.पण काकांनी तरुण रक्ताला साद घातली आणि विक्रमी वेळेत 5.59ला वर पोचलो.तिकीट काढणारे म्हणाले 5मिनिटात या जाऊन.जास्त नाही थांबता येणार.मग तिथल्याच एका सुरक्षा रक्षकासोबत गप्पा मारत पाऊण तास नेत्रसुख घेतले.ज्याला बोनस पाहिजे असेल त्याने भाजे लेणी झाल्यावर कार्ला लेणी नक्की कराव्यात.
एकवीरा देवीचे धन्यवाद मानले व परतीला निघालो.येताना हायवेला वडापाववर ताव मारला व पुणे गाठले.वरील सर्व ठिकाणे आमच्यासाठी नवीनच होती.अर्थातच सर्व श्रेय आमचे पायलट देडे सर व रोहन गुरुजींना जातंय; कारण त्यांनीच आम्हा सर्वांना सुखरुप आणले होतं.
आजची मोहिम तर यशस्वी झाली व उद्यापासूनची मोहिम पण यशस्वीरित्या नक्की पार पाडू हा आत्मविश्वास आला.
आता वेध रायगड जिल्हा दर्शन मोहिमेचे लागले होते.
Awesome writting Kishor sarv punha डोळ्यासमोरून गेले😇
ReplyDelete