रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस पाचवा
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस पाचवा
काल बरेच दमलेलो.साहजिकच उठायला उशीर झाला.सगळे आवरुन 8वाजता बाहेर पडलो. मुरुडला जाताना एका हाॅटेलमध्ये नाश्ता केला व मुरुडच्या बीचवर आलो.पण आधीच अंघोळ केल्यामुळे समुद्रात भिजायचा प्रश्नच नव्हता
येताना गर्द झाडीमध्ये वसलेले केशवराज मंदीर पाहिले.
जवळच असलेले व्याघ्रेश्वर मंदीर व झोलाईदेवीचे मंदीर पाहिले.
10.30 ला चेकआऊट करायचे होते.वेळ नव्हता म्हणून दर्शन घाईघाईत घेतले व हाॅटेलवर आलो.फ्रेश होऊन चेकआऊट केले.आता आमचा मोर्चा तामसतीर्थ बीचकडे वळवला.
इथे ओहोटी असल्यामुळे पाणी लालसर दिसले नाही.अजून कोणता तरी बीच पाहिला.एके ठिकाणी वडापाव खाल्ले. महाडच्या रुपेशदादांनी सांगीतल्यामुळे दाभोळ व जवळपासची स्थळे सहलीत समाविष्ट केली.नाहीतर दापोली करुनच माघारी फिरणार होतो.गुगलबाबांनी दाभोळला जाण्यासाठी आमच्या ठिकाणावरुन सरळ जाणारा बीचच्या कडेचा एक मार्ग दाखवला व दुसरा परत दापोलीला येऊन दाभोळकडे जाणारा.अर्थात आम्ही बीचच्या कडेचा मार्ग निवडला. ब्लॅकने पेट्रोल घेतले 200रुपयाचे व गाडी दाभोळ के दिशेने चल पडी.छोटे छोटे व चढ उताराचे वळणदार घाट प्रवासात मजा आणत होते.संपूर्ण सहा दिवसाच्या प्रवासात फक्त ह्याच मार्गावर एकदाच चुकलो होतो ते पण 200फूट गेलो व कळाले की हा रस्ता दाभोळला जात नाही. मग पुन्हा मागे फिरलो.दीड एक तासाच्या प्रवासानंतर दाभोळमध्ये पोचलो.माँसाहेब मशीद पाहिली.
धक्क्यावर आलो.
काय तरी थंड प्यायचे म्हणून एका आईस्क्रीमच्या दुकानात शिरलो.त्या मारवाडी भैय्याने सहज चौकशी केली व मी पुण्यातील पौड-मुळशीचा आहे असं सांगीतले,तर तो म्हणला पौड को मेरा रिलेटीव रेहता है,स्टँड पे भैरवनाथ आईस्क्रीम नाम की हातगाडी है.मग त्याचा निरोप घेऊन टेकडीवरील दाभळेश्वर मंदीरात गेलो.मग चंडिकादेवी मंदीराकडे प्रस्थान केले.मंदीराचा परिसर छान आहे.
मंदीर खडक आतल्या बाजूने खोदून बरीच मोठी जागा तयार केलीये.आत बराचसा काळोख होता पण समईचा उजेड आधार देत होता. दर्शन घेतले व पन्हाळेकाजी लेण्या पाहायला निघालो.जाताना वाटेत चिखलगाव लागले.म्हटले लोकमान्य टिळकांचे मूळ गाव आहे पाहूयात.मग 2-3 किमी आत गाडी वळवली व चिखलगावात पोचलो.टिळकांचे घर ज्या ठिकाणी होते आता त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभे केले आहे.
जास्त वेळ न दवडता माघारी फिरलो व पन्हाळेकाजीच्या मार्गाला लागलो.पण रस्ता एकदम कच्चा,दिशादर्शक फलकांचा अभाव व वर्दळ तर अजिबात नाही.रस्त्याला फाटे फुटायला लागले की आम्ही कोण तरी येईल याची वाट पाहायचो मग माहिती मिळाली की जायचो.शेवटी पोचलो नदी काठी पोचलो.नदीच्या उजव्या तीरावर लेणी विसावल्या होत्या.
हिंदू,बौद्ध,जैन धर्माचा संगम इथे दिसून येतो.माथेरान मग वाईच्या गणपतीनंतरची मोठी दगडी मूर्ती पाहत होतो.
लेण्यांतील Drainage व्यवस्था आवडली.घाईमध्ये पर्णालक किल्ला पाहायचा राहून गेला.नदीमध्ये हातपाय धूवून फ्रेश झालो व मग
उन्हवरेचं गरम पाण्याचे कुंड पाहायला गेलो.
इथले पाणी उन्हेरे व सवपेक्षा कडक होते.त्यात आम्ही मे च्या उन्हाळ्यात दुपारचे आलेलो.साधे पाय टाकून पण बसता येईना.कसं तरी हात पाय धुतले व मागच्या बाजूस नदीवर गेलो.खूपच रम्य ठिकाण होते.
वेळ असता तर संध्याकाळ इथेच घालवली असती.पेट्रोल संपायला आलेलं.फणसूला आलो कसं तरी. गाडी दापोलीला जाऊ शकत नव्हती.मग तिथेच चौकशी करुन पुन्हा ब्लॅकने पेट्रोल घेतले.आता दापोलीला जायचा काही संबंध नव्हता. त्यामुळे गाडी मधल्या रस्त्याने गाडी पालगडला घातली.7वीला असताना श्यामची आई पुस्तकात पालगडचा व तामसतीर्थचा उल्लेख होता.काळोख पडताना साने गुरुजींच्या मूळ घरी पोचलो.
शेजारी चौकशी केली.ते काका म्हणले उघडेच असेल,पाहा व जाताना दरवाजा बंद करा.आत आलो.लाईट लावली व गुरुजींच्या आठवणी जागोजागी जपलेल्या दिसल्या. वाचण्यासाठी जास्त वेळ नव्हता त्यामुळे फोटो काढले घर पाहिले व गुरुजींना मनोभावे प्रणाम करुन निघालो.थोडा पुढे आलो व काहीतरी खाण्याची गरज होती म्हणून एका हाॅटेलात घुसलो.लाईट गेलेली.वडापाव मागीतले.वडापावसोबत मिरची व चटणीमधील कैरीच्या फोड्या होत्या.असलं काॅम्बीनेशन पहिल्यांदा खात होतो.आवडलं,काय तरी नवीन होतं.
मोहनला(IAF) काॅल केला,म्हटलं अरे हाव-याच्या घरी आज मुक्काम करायचा होता.बाहेरुन जेवून येतो. म्हणला अरे मी घरी आलोय सुट्टीला. ये तू.मग दोघांचं जेवण करतोय म्हणला.येताना महाडमध्ये न जाता नदी क्राॅस न करता कोल वडवलीवरुन भोर फाट्यावर निघा.मग पुन्हा एकदा आमचा रात्रीचा प्रवास सुरु झाला.आता आमची परतवारी सुरु झाली. रस्ता चांगला असल्यामुळे त्रास झाला नाही. दीड दोन तासात मोहनच्या घरी सुखरुप पोचलो.अंघोळ केली व जेवायला बसलो.
त्याने चिकन आणलेलं होतं व स्वतः बनवलं होतं.मग रात्री गप्पा मारत मारत झोपी गेलो.
40 +48nashta
Petrol 200
Badam shake 60
Satbat 30
Petrol 196
Nashta 25
Comments
Post a Comment