रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस सहावा
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस सहावा
आज सकाळी निवांत उठलो,सगळं निवांतच आवरले.महाडजवळचे सव येथील कुंड व गांधारपाले लेणी करुन निघणार होतो.पण मोहनने वाळेणकुंड बद्दल सांगीतले व आधी तिकडे निघालो.
मी व मोहन एका गाडीवर आणि देडे सर व विलास(मोहनचा भाऊ) दुस-या गाडीवर.
नदीच्या कुंडामध्ये(खोलगट भागात)खायला टाकल्यावर मोठाले मासे येत असतात,तेच पाहायचं होतं.रस्त्याच्या कडेला गाडी लावली व उन्हाळ्यात कोकणातील इतर नद्यांप्रमाणे कातळखडक उघडे पडलेली कोरडीठक्क नदी पाहत होतो.(दोनच महिन्यांनी ह्या नदीचा पावसाळ्यातील फोटो whats appला पाहिला. भयानकच म्हणता येईल.) मग लोखंडी पूल ओलांडून देवीच्या दर्शनासाठी गेलो.खायला घेऊन गेलतो पण थोडं लेट झाल्यामुळे उन्हात मासे बाहेर येत नाहीत असं स्पष्टीकरण मोहन व विलासने दिले.मग फोटोसेशन करुन लेण्यांकडे मोर्चा वळवला.जाताना मोहनची खरवलीची जागा पाहिली. लेण्यांकडे जाण्यासाठी नवीनच बांधकाम केलेल्या दगडी पाय-या दिसत होत्या.लेण्या कोरीव नव्हत्या.गुंफा म्हणता येईल.
काम अपूर्ण राहिलेलं असावं.लेणी पाहून झाल्यावर मोहन म्हणला," सवला तुम्ही जावा.महाडमध्ये असलो तर भेटूत."मग सवच्या कुंडाकडे जिथून जातात त्या हाॅटेलला गाडी लावली व नदीजवळ आलो.नदीपलिकडे जाण्यासाठी एक नाव होती.ती पलिकडून आमच्याकडे येताना दिसत होती.बांबूपासून बनवलेली 10×3 फूट असेल.पहिल्यांदाच नावेत बसत होतो.(आधी शिडाची होडी मग जेट्टी-फेरी) चाचाने वल्हे मारत मारत आम्हाला पलिकडे नेलं व सवकडे झाडीतून जाणारी वाट दाखवली.तुमचे झालं की फोन करा मी पलिकडे सोडायला येतो असं सांगून ते जेवायला गेले.
मशिदीच्या शेजारी झाडीत ते कुंड लपले होतं.उन्हवरेपेक्षा इथले पाणी कमी गरम होते.म्हटले अंघोळ केलीच पाहिजे. अर्धातास पाण्यात बसून बाहेर निघालो.चाचाला फोन केला.ते पण 10मिनिटांत आले.नावेजवळ आलो आणि 40-50मीटर अंतरावर मगर दिसली.आमची तर तंतरलीच. आम्ही नाही बसणार म्हटले.चाचा -
उसकी ताकद सिर्फ पानी में है !
मी -होडीला शेपटी मारली तरी पलटी होऊ आपण?"
चाचा -नही होता,मेरा 20साल का अनुभव है! मग आम्ही जीव मुठीत धरुन बसलो.सुखरुप पोचलो.चाचाने
जायचे यायचे 50रु घेतले.
खूप भूक लागली होती."चवदार तळे" पाहून जेवायचे ठरवले.तळं व स्मारक पाहिले.
इथून संताजी नावाचे पुस्तक खरेदी केलं .रुपेशदादाला काॅल केला.
ते पाच मिनिटांत पोचले.(दादा तुंग किल्ल्यावर येऊन गेलते 2015/16 ला.पण आमची भेट झाली नव्हती. नंबर असल्यामुळे तेव्हापासून online touchमध्ये होतो.)
मग त्यांनी तळ्याजवळील एका खानावळीत जेवणाचे सुचवले.जेवण छान आणि स्वस्त होतं.आमचा काळा रंग पाहून किती फिरलोय याचा अंदाज सांगीतला. जेवताना सहलीचे वर्णन थोडक्यात सांगीतले. दादांचा निरोपरुपी आशीर्वाद घेऊन निघालो.
ज्या रस्त्याने घाटाने गेलो तो परत करायचा नाही,ह्या न्यायाने ताम्हीणी घाटाऐवजी वरंधा घाटाकडे मोर्चा वळवला. आधी एस.टीतून प्रवास केला होता पण इतका घाट दिसला नाही.आज घाटाचे दर्शन छान झाले.माझ्या आवडत्या घाटांमध्ये वरंधा Top 3 मध्ये पोचला.
अजून एक अनुभव इथे पण आला. रायगड जिल्ह्याची हद्द संपली आणि खराब रस्ता सुरु झाला.धरण जवळपास कोरडे असल्याने व रस्ता पण खराब असल्याने तितका उत्साह जाणवला नाही.मग एके ठिकाणी नाश्ता करुन भोरकडे गाडी दामटली.
काळोख पडायला सुरवात झाली होती.भोरमध्ये पोचलो.राजवाडा नेहमीप्रमाणे बाहेरुनच पाहिला. नदीकाठी जाऊन नीरा नदीचे दर्शन घेतले व पुण्याकडे निघालो.
नेकलेस पाॅईंट घाटातूनच पाहिला व निघालो.8च्या सुमारास माझ्या रुमवर पोचते झालो व आमची सहल सफल झाली.
6th day
Petrol 300
Sarbat 20 jevan 160+20
Bhel 110
Pani 20
Sav naav 50
Comments
Post a Comment