सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India
मध्यप्रदेश -Heart of India
मे 2018ची रायगड जिल्हा दर्शन सहल सफल झाली आणि अजून एक जिल्हा करु शकतो असा आत्मविश्वास माझा मलाच आला. रत्नागिरी जिल्हा करायचा ठरवलं(एकट्यानेच). प्लॅन रेडी झाला.प्रयाणाची(नीट वाचा नाय तर प्रणय वाचाल घाईत) तारीख पण फिक्स केली.20 ऑक्टोबर.8दिवस.ह्या वेळचा पार्टनर किरण होता.पण झालं काय,भावाने सुचविलेल्या एका कंपनीमध्ये जाॅईन झालो आणि सगळा फियास्को'च झाला ट्रीपचा.मग पुन्हा ठरवले, उन्हाळ्यात भारतातील एक पूर्ण राज्य फिरायचे व दिवाळीत
महाराष्ट्रातील एक पूर्ण जिल्हा.
एक वर्ष असंच गेलं.मग म्हटले की,ह्या दिवाळीत तरी सीमोल्लंघन केलंच पाहिजे.ऑगस्टमध्ये चार दिवस गुजरातला मुक्काम करुन आलेलो पण घंटा कुछ देखा नही.असले सीमोल्लंघन काय कामाचे ना? खानदेशातून मुसंडी मारुन नर्मदेपार मध्यप्रदेशात चढाई करायचा विचार केला. देडे सर व किरण दोघे पण तयार झाले. मला सुट्टी नव्हती म्हणून दिवाळीच्या सुट्टीमध्येच कार्यभाग साधून घ्यायचा होता(uffff, yeh private job bhi na.)
उत्तरेत नांदगावच्या(जि.नाशिक) वर गेलो नव्हतो कधी.त्यामुळे अंदाजावरच प्लॅन होता.गुगलकडून गरजेपुरती माहिती घेतली होती.
25 तारखेला सकाळी 6च्या "पुणे-दोंडाईचा" गाडीचे आरक्षण केलं व दिवाळीची वाट पाहू लागलो.
दरम्यान सहलीच्या उद्देशाने थोडी खरेदी केली.
24च्या रात्री मी पुण्यात देडे सरांच्या रुमवर राहायला गेलो.किरण डायरेक्ट शिवाजीनगरला येणार होता.
आज 25 October 2019
सकाळी उठून 5.45 ला एस.टी स्टँडला पोहोचलो. अंदाजापेक्षा जास्तच गर्दी होती.चौकशी काऊंटरजवळ जायचे म्हणजे चक्रव्यूह भेदण्याची ट्रायल घेत होतो.एस.टी प्रशासन प्रवाशांच्या विस्फोटामुळे सैराट झालेलं.कोणतीही गाडी कुठल्याही फलाटावर लागत होती.खूप गर्दी गाड्यांची व प्रवाशांची पण.आम्हाला तर भीतीच वाटायला लागली की,गाडी बाहेरुनच जाते की काय.मग म्हटले बाहेरच्या बाजूला काय चाल्लंय बघूयात.entrance ला आलो तेवढ्यात दोंडाईचा गाडी दिसली.दरवाजा उघडून आत बसून घेतले.अर्ध्या तासाने गाडी फलाटावर लागली.चालक-वाहक आत आले.आमची एक सीट ड्रायव्हर शेजारी होती व बाकी दोन मागे.
ड्रायव्हर- ह्या सीटवर बसलंय.
मी-आरक्षण केलेलं आहे.
ड्रायव्हर-नाही नाही तुम्ही मागे बसा.
मग कंडक्टरने ड्रायव्हरला समजावले असावं.मग तिथे किरणला बसवले व मी व देडे मागे बसलो.गाडी फुल्ल भरली होती.दीड तास लेट होतो.ऐन दिवाळीत महामंडळाने भाडे वाढवले व हा निर्णय पूर्वलक्षी होता.म्हणजे आम्ही एक महिना आधी आरक्षण करुन काहीच फायदा झाला नाही व 120रु जास्तीचे गेलेच. पुढे चालकाने अ.नगर ला एका कारला हलकीशी धडक दिली.गाडीचे थोडं नुकसान झालं.त्यात तडजोड होईपर्यंत एक तास गेला.इथून चालक लयच हळू झाला.गाडी पकडायच्या नादात काहीच खाल्ले नव्हते आम्ही.खूप भूक लागलेली.येता येता श्यामने चिवडा दिला होता तो खायला सुरुवात केली.बरं वाटलं जरा.आधार मिळाला पोटाला.किरणला चिवडा द्यायला गेलो.बघतो तर किरणच्या समोर बॅगांचा ढीग पडलेला. बिचा-याला पाय हलवायला पण नीट जागा नव्हती.
गाडी हळूच होती पण नाॅनस्टाॅप होती.ड्रायव्हर बहुतेक टेन्शनमध्ये गेला असावा.त्याला जाऊन समजावले- 6-7तास झालेत गाडी कुठेच थांबली नाही,लोकांना भूका लागल्यात.लेडीज लोकांना पण फ्रेश व्हायचंय.मग पठ्ठ्याने एका अतिदुष्काळी हाॅटेलला गाडी 10मिनिटांसाठी थांबवली,जिथे फक्त चहा होता पण नाश्ता रेडी नव्हता.मग 10मिनिटांतच गाडी निघाली.धुळ्यात पोचायले आम्हाले 7वाजले.इंदोरला जायला फक्त दोन st गाड्या होत्या.पण त्या आमच्या वेळेत नव्हत्या.धार मारुन आलो व हाॅटेल गुगल केलं.पण काय चांगले हाॅटेल नाहीच मिळाले.मग एक हाॅटेल पाहिले ते 2-3किमीवर होतं.शेवटी तिकडेच जायचे ठरलं. हाॅटेल *** वाटत होतं.म्हटले लय महाग असणार पण बजेटमध्ये होतं. Pure veg त्यात.मग खानदेशी भरलेलं वांग मुख्य मेन्यू ठेऊन बाकी ऑर्डर दिली.खाने के बाद कुछ मीठा तो बनता है ना बाॅस.मग मिनिमम ऑर्डर 4 गुलाबजामची होती.(तसं मी एका वेळेला 10-12 गुलाबजाम खात असतो पण अजून रात्री पण प्रवास बाकी आहे हे ध्यानात ठेऊन कंट्रोल केलं.)साईजने थोडे मोठे गुलाबजाम होते.मी दोन खाल्ले (ofcourse,order मी दिलेली ना) त्यांनी एक-एक.
नंतर बील पाहिले व कळाले की आपण आपल्या आयुष्यातला आतापर्यंतचा महागडा म्हणजे 30रुपयावाला एक गुलाबजाम खाल्ला आहे.बरं झालं control केलं नायतर भांडी घासायला राहिलो असतो.पुन्हा रिक्षा केली व हायवेला आलो.दोन National Highway एकत्र येतात म्हणजे इथून इंदौरला जायला गाडी मिळू शकते,असा अंदाज मी बांधलेला होता.मग गाड्यांना हात करायला सुरुवात केली.पण काय थांबेनाच.किरण व देडे मनातून लय शिव्या घालत होते.त्यांचे म्हणणे होतं की धुळ्यात मुक्काम करुत.पण मी ते धुडकावले.
बहुतेक तिघे जण लुटू शकतील ह्या भावनेने जास्त कोणी थांबत नव्हते. पाऊण- एक तास गेला असावा.एक झायलो कार आली. इंदौरचे प्रत्येकाचे 250रु होतील असं सांगीतले.आम्ही तयार झालो.आमच्या सोबत अजून 4 भय्ये बसले.आम्ही मागे बसलो.सीटखाली पायाला दारुची रिकामी बाॅटल लागली.म्हटले भैया-ये तो दारु की बाॅटल है . तो म्हणला-वो तो 10-15दिन पुरानी है.तरी पण जीव मुठीत धरुनच प्रवास सुरु केला. Oyoवर 1-2रुम बुक केल्या.
देडे व किरणला एका गुलाबजामची नशा चढून ते लगेच झोपी गेले.मी 10-12 खाणारा,मी आपला जागाच होतो.सगळे झोपले,फक्त मी व ड्रायव्हर जागा होतो.100च्या speed ला होतो. झालं काय,आम्ही Rightलेनला होतो व left कडून एक टेम्पो इंडिकेटर न देताच right ला सरकला.ड्रायव्हरने गाडी चांगली कंट्रोल केली,गाडी vibal झाली, divider ला एकदा घासली पण back to normal आली.आमच्या ड्रायव्हरने टेम्पोवाल्याला दोन-तीन शिव्या घातल्या.देडेंना जाग आली. म्हणले काय झाले?मी म्हटले झोपा सकाळी सांगतो. 2.30वाजता कोणत्या तरी एका चौकात उतरलो.रिक्षा टॅक्सी काहीच दिसेना.मग Ola वर एक कार दिसली.बुक केली.तो पण नेमका भाडे सोडून घरीच निघालेला.google mapवर हाॅटेल search केलं व मॅपवर टाकले. हायवेच्या डाव्या बाजूला वळून बरेच आत गेल्यावर एका पूलासमोरच्या लाॅजसमोर त्याने थांबवले.उतरुन तेच हाॅटेल आहे का ते चेक केलं व पैसे दिले.लाॅजवाल्याला फोन केला पण तो म्हणला तुमचे बुकींग कॅन्सल झालंय.आमच्या तर कपाळातच.त्याला सांगीतले पण तो काय ऐकेनाच.तिथूनच oyoवरुन एका रेसिडेन्सीमध्ये रुम बुक केली.तेवढ्यात दोन गणवेषधारी पोलिस गाडीवरुन आमच्या समोर येऊन थांबले. मग intro सुरु झाला.
पोलिस-कहा से हो?
आम्ही-महाराष्ट्र,पुणे से
पोलिस-यहा क्या कर रहे हो?
आम्ही-वो होटल की बुकींग कॅन्सल हो गयी
पोलिस-ऐसे कैसे कॅन्सल हुई?
आम्ही-online book कि थी.पता नही कैसे.
पोलिस-यहा क्या करने आये हो?
आम्ही-घूमने के लिये
पोलिस-क्यो ?आप के यहा दिवाली नही मनाते क्या?
आम्ही-हा मनाते है पर सोचा यहा की दिवाली देखते है .इसलिये आये.
पोलिस-ठीक है .दस मिनट मे यहासे चले जाना .अगर फिरसे दिखाई दिये तो थाना ले जाऊंगा.
आमची तर फाटलीच. MP सारख्या राज्यात अशी सुरवात व स्वागत.बच के रहना चाहिए रे बाबा.मग Ola-uber वर पाहिले पण कोणी दिसेना.मग चालायला सुरवात केली.10-15मिनिटानंतर एक रिक्षा दिसला.त्याला बुक केलेल्या रेसिडन्सीकडे न्यायला सांगीतले. आता हायवेच्या उजव्या बाजूस वळून 2किमी आत आलो तर ती एक सोसायटी होती आणि नंबरवर काॅल करतोय तर लागत नव्हता.5मिनिट थांबलो.मग रिक्षावाला म्हणला इतना देर मत रुको .चलो यहा से.कोई देख लेगा तो लफडा हो जायेगा.मग रिक्षा हायवेवर आणली.4वाजून गेलेले.तो म्हणला -कहा जाना है आपको?
मी-ओंकारेश्वर.अब तो नींद भी उड गयी है.सीधा दर्शन ही करेंगे.
तो-ठीक है ,सरवटे बस स्टाॅप से मिलेगा.
मी-चलो.
सरवटे बस स्टाॅपला उतरलो.त्याला 250रु दिले.तेवढ्यात मला एक लाॅज दिसले.गेलो चौकशी करायला.समोर एक भैया बसलेला होता.
मी-रुम चाहिये थी?हम तीन है.
तो-500रु.
मी-कितना घंटे?
तो-24. मी तर खूश झालो.(च्यायला oyo ला तर 12तासाला 650पासून पुढे चार्जेस होते.) म्हटले देखनी है.
वर गेलो दोन बेड एकत्र केलेले होते.पाणी पण होते.Done केली.
बॅगा टाकल्या कपडे चेंज केले व झोपी गेलो.
Comments
Post a Comment