गोव्यातील Do's & Dont's
गोवा -Do's & Dont's
1) स्वतःची चारचाकी/बाईक (आणि स्वतःचीच बाई) असावी.
2)रेन्टवरील बाईक(आणि बाई) परवडत नाही.
3)ओझे जास्त नको. Energy loss होते. सॅक सांभाळता सांभाळता
पर्यटनाच्या आनंदाला कधी घोडा लागतो काय कळत नाही. Go with Free Hands.(सॅक चारचाकीमध्ये ठेऊन आनंद घेता येऊ शकतो.)
4)off season मध्ये गोव्याला जाताना Bikini Babes दिसतील, ह्या अपेक्षेने अजिबात जाऊ नका.पक्का हिरमोड होईल.
Off Season ला गजबजणा-या बीचेस वर फक्त कुत्रीच असतात.(अहो खरंच 14 फेब्रु.गेलतो तेव्हा लाख लोक असतील आणि 28सप्टे.ला आम्ही दोघे आणि अजून एक अनोळखी कपल आणि 12-15 कुत्री बीचवर फिरत होती.)
5)स्वस्तामध्ये रुम्स मिळून जातात. बिनधास्त बार्गेनिंग करा.(Bargening is the Customers first right na.)
6)आपल्या कोकणातील सोलकढी आणि गोव्यातील सोलकढीमध्ये खूप फरक बुवा.(गोव्यातील सोलकढी कसलीतरी लसणाची फोडणी दिलेलं पाणी असतंय ते)
7) स्वयंघोषित English भाषेची वाट लावू नका. मिंदी भाषेत (हिंदी+मराठी) तर अजिबात बोलू नका.
गोव्यातील लोकांशी मराठीत बोला.येते त्यांना मराठी. नायतर नंतर उगाच पश्चाताप करुन घ्याल की मराठी माणसाशी मराठीत बोललो नाही म्हणून.
8) साऊथ गोव्याला जायची जास्त गरज नाही.जवळपास सगळं काही नाॅर्थ गोव्यात आहे .
9)मडगाव रेल्वे स्टेशनवर फ्री मोबाईल चार्जिंग पाॅइंटस आहेत.(I knew only about madgaon)
10)सुतारफेणी खाणा-यांनो
अधिक माहितीसाठी सांगतो -काजूफेणी हा गोव्यातील फेमस पदार्थ कोणत्याही स्वीट होम मध्ये मिळत नाही.(काजूफेणी आणि सुतारफेणीचा चुकूनही संबंध लावू नये.)
11)गोव्यातील बस कंडक्टरने तिकीट का दिले नाही म्हणून जाब विचारु नका.(अपवाद-kpcl बस)
12)Must visit Reis Magos Fort.
Go- Goa -Gone
😂😂😁😁😀😀
ReplyDeleteThank u rupeshji
DeleteKeep visiting