MPSC@सदाशिव पेठ

स्पर्धा परीक्षार्थींचे सासरघर-सदाशिव पेठ,पुणे.
        हल्ली बेरोजगारी इतकी वाढलेय की एखादा दगड बेरोजगारांच्या गर्दीमध्ये भिरकावला तर तो नक्कीच एका इंजिनियरचे डोकं  फोडणार.पण आमच्या पुण्यातील सदाशिव पेठ नेहमीप्रमाणे अपवाद आहे. इथल्या सुशिक्षित बेरोजगार असलेल्या  विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये एक दगड मारला तर तो दगड चार ते पाच एम.पी.एस.सी(MPSC) करणा-या विद्यार्थ्यांना लागेल इतके 'ध्येयवादी बेरोजगार' इथे आहेत.महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून इथे ध्येयवेडे(वेडं झाल्यावर ध्येयाच्या मागे जाणारे)
            तर हा mpsc करणारा प्राणी कसा दिसतो माहितीये का?21 ते 26 ह्या वयोगटातील टी-शर्ट,ट्रॅक पँट/जिन्स, पाठीला सॅक,चेह-यावरील तेज कधीतरीच दिसणारं, खुरटी दाढी वाढलेली,गाल आणि डोळे आत गेलेले (घरचे तर स्वतःच्या बालकाला कुपोषितच समजतात.)
         सकाळी 8-8.30 पर्यंत इथल्या सर्व अभ्यासिका हा प्राणी व्यापून टाकतो. अभ्यासिका म्हणजे पुस्तकात डोके घालण्याची जागा.24 तासातील 10-14 तास इथेच घासली जातात.अभ्यासिकेत आल्यावर कळते की स्पर्धा (Competition) काय असती ते.पूर्णवेळ रुममध्ये अभ्यास करुन अधिकारी होणा-याला Hats off  आणि पाच वर्षे पुरतील एवढ्या शुभेच्छा.
                इथे अभ्यासिका/लायब्ररी असे शब्द फारच कमी वेळा ऐकायला येतात.कारण की लायब्ररी ह्या शब्दाचा अपभ्रंश "लॅब्री" असा झालेला आहे.
         "चहाला" 'सदाशिव पेठीय पेय' म्हणायला हरकत नाही.रात्री 10.30-11 नंतर अभ्यासिकेतून परतताना चौकातील मसाला दूध 'स्वतःच' प्यायचे.(स्वतःच या अर्थाने की सिनेमामध्ये सुहागरातीला सजलेली नववधू  स्वहस्ते दूध घेऊन येते-पाजते ना.तसला प्रकार इथे नाही.) इथल्या मसाला दूधाला सदाशिव पेठेचं "Night Drink" म्हणायला हरकत नसावी.
            MPSC म्हणजे मुलांची Girlfriend, बायको, जानू,जान आणि मुलींसाठी mpsc आयोग म्हणजे त्यांचा Boyfriend,नवरा, पिल्लू,बच्चू,शोणा इ. तर MPSC मधील पोस्ट म्हणजे सर्व माजी अपयशी विद्यार्थ्यांची/चा Crush आहे.
            Mpsc ची परीक्षा क्रॅक झाली नाही म्हणून लकडी पूलावरुन मुठा नदीमध्ये जीव दिल्याची घटना अजून तरी घडलेली नाही.बघा किती असामान्य धैर्य  आणि जिद्द आहे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये.
               जगात दररोज कोणी रक्तदान करत असेल तर तो म्हणजे सदाशिव पेठेतील विद्यार्थी.हो ना काय सांगायचे आता तुम्हाला;जगातली सगळ्यात जास्त ढेकणं इथंच आहेत की काय असाच प्रश्न पडतो.
दिवसभर अभ्यास करुन घाम गाळायचा आणि रात्री ह्या ढेकणांसाठी रक्त गाळायचे.
            इथे लक्ष ठेवायला घरचे कोणी नसते.मग स्वातंत्र्याचे स्वैराचारात झालेलं रुपांतर पाहायला मिळते.सगळ्याच नाही पण काहीपैंकी एक मुलगी 3-4 मुलांना फिरवताना दिसते तर एक मुलगा 3-4 मुलींना फिरवतो.(मी गेली 26 वर्षे एकटाच फिरतोय.इथं पण कोणी सापडेना.)
सुट्टीमध्ये घरी आलेल्या आपल्या कुपोषित पाल्यासाठी(अभ्यास करुन 'दिवे' लावणा-या कार्ट्याला/कार्टीला) दररोज चिकन-मटण खाऊ घातले जाते. सदाशिव पेठेत राहून आपला पाल्य "पूर्ण शाकाहारी" बनू नये, हाच काय तो उद्देश असावा.
            इथल्या विद्यार्थ्यांचा त्याग, संघर्ष पाहिल्यावर नक्की खात्री पटते की ते mpsc करण्याच्या लायक आहेत; पण पद मिळवण्याची लायकी अभ्यासातूनच दिसते.
         सलाम त्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला !!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी