गोवा -Reis Magos

28 सप्टेंबर 2017.
दुपारची वेळ.पणजीवरुन कलंगुटला जाताना वेरे स्टाॅपवर उतरलो.तिथून समुद्रकिना-याच्या रस्त्याने चालत निघालो. अर्धा एक किलोमीटर आलो असू तेवढ्यात एक बोर्ड दिसला.त्यावर होते Reish Magos 3km.बसवाला तर म्हणालेला की उतरल्यावर 5मि.पोहचाल. बोअर नव्हतो झालो पण सॅकच्या ओझ्याने नकोसं झालतं. (सर्वांसाठी सूचना गोव्यात फिरा / अजून कुठेही फिरा पण विंचवाचे बि-हाड घेऊन फिरु नका. मुक्तहस्ते फिरा. आणि हो टू/ फोर व्हिलर पायजेच.)आज समुद्र फोटोमध्ये पाहतो तसा निळाबिळा काही नव्हता. पावसाच्या ढगांचा राखाडी रंग समुद्राने ओढला होता.
जवळपास 2_-2.5किमीची पायपीट करुन रईस मागोस/रेश मोगोस किल्ला दृष्टीक्षेपात आला.(गोव्यातील नावांच्या पाट्या आणि त्यांचे उच्चार ह्यात लय फरक आहे. So be careful)
ऑफिसमध्ये 50रु./प्रत्येकी अशी दोन तिकीटे काढली. बघा गोव्यातील एक किल्ला पाहण्यासाठी किती फी आहे ते.नाहीतर आपल्याकडे कोणीही कधीही येतंय जातंय ते पण.....फुक्कट.जाताना विचार केला; पहिल्यांदाच पैसे देऊन किल्ला पाहतोय वसूल व्हायला पाहिजेत. जसजसे पुढे गेलो तसतसे जांभा खडकामधील Reis Magos स्पष्ट दिसू लागला.किल्ल्याकडे जाणारा रस्ता एकदम स्वच्छ होता. तिकीट चेक करणा-याने कुठून कसे जावे ते समजावले.
डोक्यावर डेथ होल(Death Hole)होते.(मी नाही सांगणार काय असते ते. तुम्हीच पाहून या)दोन बुरुजांवर तोफा नीट ठेवलेल्या होत्या. (प्रदर्शनातील एका फोटोमध्ये तोफा खालीच होत्या.पण ह्यांनी स्वतःचे डोकं वापरुन त्यांना लाकडी चाकांवर ठेवलेल्या दिसतात.)
एका
कोप-यात एक मध्यम आकाराचे सुस्थितीतील मडकं ठेवलेलं होतं. पिण्यासाठी नाही रे.तर कचराकुंडी म्हणून.बघा किल्ल्याचा नैसर्गिकपणा कसा जपला त्यांनी. प्लॅस्टीकची+निळ्या-पिवळ्या रंगाची कचरापेटी नक्कीच odd दिसली असती. तटबंदीला जागोजागी छोट्या Lights होत्या. एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची प्रतिकृती ठेवलेली होती व सभोवतालच्या भिंतींवर किल्ल्याचे जुने व नवीन फोटो लावलेले होते.खरंच हा एक किल्ला पुन्हा उभारायला 4 वर्षे का लागली ते कळाले. ह्या किल्ल्याचे रिस्टोरेशन ज्याने केलं त्या आर्कीटेक्चरला पोर्तुगाल सरकारने त्यांच्याकडील किल्ले रिस्टोअर करायला बोलावले म्हणे.दुस-या एका दालनात चित्रप्रदर्शन होते व खाली एका फरशीवर डेथ होलची वरील बाजू होती.(पोर्तुगीजांनी 'होल सिस्टीम'चांगली वापरलीये इथे आणि आग्वाद किल्ल्यावरदेखील.)
किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिणेला समुद्र आहे. पश्चिमेकडील व्ह्यू classic आहे.एका लोखंडी जिन्याने खाली उतरलो दक्षिण बाजूला.तिथे 5_6खोल्या होत्या आणि विविध चित्रकारांचे प्रदर्शन भरवलेलं होतं.काही वेळात बाकी किल्ला पाहून ऑफिसला पोचलो. छोटासा किल्ला आहे हा; 50 मिनिटे खूप झाली पाहायला.मुळात आम्ही सोशल व्हिजन संस्थेतर्फे गोव्यातील किल्ले पर्यटनाचा अभ्यास करण्यासाठी गेलेलो.साहजिकच तिकीट विक्री करणा-या काकांसोबत गप्पा मारायला सुरुवात केली.( गोव्यातील लोक कोकणी भाषा बोलतात आपल्याला आकलन व्हायला अवघड आहे पण आपली मराठी पण चांगली बोलतात ते.)येणा-या गि-हाईकांना तिकीटे देत आमच्याशी संवाद साधत होते पण लोड वाढला आणि त्यांनी आम्हाला मॅनेजर अधिक माहिती देतील असे सांगत त्यांनी केबिन दाखवली. मॅनेजर साहेब काॅम्पुटरवर काम करत होते.म्हटले आता हा माणूस आपल्याला 10 मि. हाकलेल पण जवळपास 1.30 तास त्यांनी किल्ल्याविषयी माहिती दिली.तेही हातातील काम बाजूला सारुन(महाराष्ट्रात असा politeness कधी येईल कुणास ठाऊक.) किल्ल्याचा इतिहास- भूगोल, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरांनी किल्ले पर्यटनासाठी विशेषतः Reis Magos साठी घेतलेले प्रयत्न, सद्यस्थिती, किल्ल्याचे इनकम सोर्स वाढविण्याचे उपाय तर भन्नाट आहेत.ASIच्या ताब्यातील कोणत्याच किल्ल्याचा विकास होत नसतो हेही पटवून दिले आणि ते आग्वाद किल्ला पाहिल्यावर त्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलं.
गोव्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. किल्ले पर्यटनातून उत्पन्न व रोजगारनिर्मिती करणे ही त्यांची मूलभूत गरज आहे आणि आपली अनास्था.
विचार करा गोव्यातील हा एक किल्ला महिन्याला 1.5 ते 2.5 लाख रुपये नक्कीच कमवत असेल. मग महाराष्ट्रातील किल्ले का नाही??? महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याची गडकिल्ल्यांप्रति असलेली अनास्था म्हणजे -"म्हातारा माणूस आहे आज ना उद्या मरणारच,असं म्हणून दुर्लक्ष करायचे आणि मेल्यावर त्याच्या नावे एखादं दुसरं बांधकाम करावे."
पण गोवा सरकारचे तस नाहीये. आम्ही विचारले की "तुम्ही काही ठिकाणी नवीन बांधकाम करुन त्यातील मूळ सौंदर्याला बाधा आणली आहे." तर मॅनेजर साहेब म्हणाले-"मग ते अवशेष पूर्णपणे नष्ट व्हायची वाट पाहायची का? मग नव्याने बांधकाम करण्यात काहीच अर्थ नाही."
50रु.केव्हाच वसुल झाले होते आणि बिना तिकीटाचा- फुकट असलेला आग्वाद किल्ला खुणावत होता.
(Special thanks to Shailesh Karkate-my Accomplice &
Vibhav Sawant-Manager,Reis Magos Fort)

Comments

  1. Thank you brother ..
    For such realistic write up.. will visit again

    ReplyDelete
  2. Very nice Shailesh sir and Kishor sir...Keep it up

    ReplyDelete
  3. This blog was really helpful for me. Hope you will write more and publish.
    Rent a Bike Goa

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

      Delete
  4. Replies
    1. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

      Delete
  5. Replies
    1. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

      Delete
  6. Thank you for this amazing information this was so good i need more blog like that.
    Taxi Hire in Goa

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

      Delete
  7. Nice blog thanks for shearing interesting information.
    Car Rental in Goa

    ReplyDelete
  8. Informative Blog, waiting for more such kind of Informative blogs

    Car Rental in Goa
    Self Drive Cars in Goa

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

      Delete
  9. अतिशय सुंदर माहिती ..... तुमचे स्पष्ट विचार खरंच छान आहेत ... याची कोणी दखल घेत नाही आणि सरकार दरबारी आपल्या गडकोट बाबत अनास्था सर्वपरिचित आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना.
      पुरातत्व खाते नेहमीच पुरात वाहून जाते.
      होईल ठीक पण लवकर व्हायला पाहिजे.

      Delete
  10. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

    ReplyDelete
  11. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

    ReplyDelete
  12. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

    ReplyDelete
  13. Thank you for your appreciation.we will get back to you soon with another fresh content.stay tuned.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी