Ladies First
हल्ली सगळ्याच क्षेत्रात Ladies First ही प्रथा काही वर्षांपासून सुरु आहे. आरक्षणापेक्षाही
कित्येक पटीने जास्त क्षेत्रे व्यापलेली असंतुलित पण Effective प्रथा आहे.
पण ह्या प्रथेने महिलांमधील Feminism ला तसेच त्यांच्यातील स्वाभिमानाला तडा जात असल्याचे दिसते.
हल्ली सगळ्याच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रगती करताना दिसत आहेत.त्यातून आपल्याला त्यांचा संघर्ष दिसून येतो. पण Ladies First सारख्या प्रथेने काही दोष निर्माण केले आहेत.
समजा एखाद्या मुलीला-महिलेला रांगेत उभे राहायचंय पण एखादा अतिसंवेदनशील पुरुष असतो, तो ओरडतो, "Ladies First" आणि तिला नंबर मिळवून दिला जातो आणि बाकी पुरुष पण स्वतःचा Male Ego सावरुन तिला आपल्या आधी नंबर देतात.
-ह्याने होतंय काय,तिला तिच्यातील संयमाची जाणीव होत नाही.
-स्वतःच्या क्षमता कळून येत नाही.
-काही जणींचा स्वाभिमान,Feminism (स्त्रीत्वाचा अहंकार) दुखावला जातो.त्यांचं म्हणणे असते की आम्ही बाईमाणूस असलो म्हणून काय झाले?आम्ही पण पुरुषांच्या बरोबरीने कित्येक तास रांगेत उभे राहू शकतो.आमच्यातील क्षमतांना कमी लेखू नका.बाई आहे म्हणून 'सहानुभूती' देऊ नका इ.कारणे Feminist महिलांकडून मिळतात.
-मग तिला पुढे सारखी अपेक्षा राहते की कोणीतरी बोलले पाहिजे Ladies First आणि लवकर नंबर मिळावा.
-एकीला नंबर दिला की बाकी 2-3 बाया पण तिच्यासोबत चान्स मारुन घेतात.
-पुरुषांनाही वेळ महत्वाचा असतो ह्याची जाणीवच कोणाला राहत नाही.
-माझ्यासारख्याचा Male Ego दुखावला जाऊ शकतो.
-एखाद वेळेस वृद्ध, अपंग, गरोदर व बाळ असलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात काहीच चुकीचे नाही.किंबहुना फक्त ह्यांच्यासाठीच
Ladies First ची पाटी प्रत्येक कार्यालयात असायलाच हवी.
-महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग तयार करुन समानतेचे तत्व जोपासले जाऊ शकते.
You know,you are सुज्ञ.
पुरुषांनो Ladies First द्वारे फुकटची सहानुभूती देऊन महिलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवू नका
आणि
स्वतः महिलांनीही Ladies First प्रथेचा त्याग करुन संयम-क्षमता वाढविली पाहिजे.
Comments
Post a Comment