5 वर्षे Quarantine
5वर्षे क्वारंटाईन
ग्रामीण भागातील बहुतेक सर्व व शहरी भागातील 30% अशिक्षित व सुशिक्षित महिला-मुली मासिक पाळीमध्ये प्रत्येक महिन्यातील 5 दिवस ह्याप्रमाणे वर्षाचे 60 दिवस म्हणजेच पूर्ण दोन महिने क्वारंटाईन असतात.(फरक लक्षात घ्या मित्रहो कोरोनातील खाऊन पिऊन राहिलेलं
क्वारंटाईन वेगळं.)
जवळपास 15 ते 45 ह्या 30वर्षात पूर्ण 5 वर्षे क्वारंटाईन.इमॅजिन करुन पाहा की तुम्हाला कोण तरी सांगतंय(स्वतःहून नाही) की, तुझ्या आयुष्यातील पाच वर्षे तू जगायचेच नाही...
लेडिजांनो,खरंच धन्य आहात.
मानले तुम्हांला.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काही गोष्टी काळानुसार बदलायला हव्यात. अर्थात ह्या प्रथेचे मी समर्थन करत नाही.महिन्यातून पाच दिवस जगणे हिरावून घेणारी क्वारंटाईन करणारी ही प्रथा त्या काळी थोड्याफार प्रमाणात योग्यच होती. देवाची भीती दाखवली नसती तर ही प्रथा नसती पडली.कारण त्याकाळी लोक फक्त देवाला व भूतालाच घाबरायचे.असो.कोणत्या का कारणाने महिलांना आराम मिळाला हे बेस्ट झाले.(म्हणजे तुम्ही गणिती क्रियांसाठी पाढे वापरा किंवा गुणाकार भागाकार करा.Result Matters.) हळूहळू ह्यात सकारात्मक बदल होताना दिसून येत आहेत,ही नक्कीच आशादायक बाब म्हणता येईल. अंधश्रद्धा,अज्ञान व अशिक्षितपणा यांचा समूळ नाश व्हायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपण 21व्या शतकात जागतिक नेतृत्व करायला तयार असू.
सत्य परिस्थिती आहे ही.
ReplyDelete