पार

झाडाभोवतीचे पार नष्ट केले तर.....

पूर्वीच्या काळी झाडाभोवतीच्या पाराचा जुजबी उपयोग माहित आहे.
तेव्हापासून ते आता पर्यंत गावातील पारावर काय दिसते आपल्याला??

एखादा म्हातारा सुनेची कटकट नको म्हणून आपल्या नातू-नातीला घेऊन खेळवताना दिसतो,तोच मग येणा-या जाणा-याला अडवतो व इतरांचा वेळ खर्च करतो.
तरुणांचा घोळका आधीच गप्पा मारत असेल तर त्यांना म्हाता-या लोकांचा अडसर होतो व ते जागा बदलतात.
विषयाची सुरवात गल्ली, गाव,शेजारचे गाव,तालुका ते देश अशा कोणत्याही ठिकाणापासून होते.
ह्यात ख-या माहितीचा अभाव दिसून येतो.बातम्या रंगवून सांगीतल्या जातात.जवळून येणारा-जाणा-या एखादा/एखादीची 'चारित्र्याची कुंडली'च जाहीर केली जाते. कधीकधी त्याला पण गप्पांमध्ये सामावून घेतले जाते.

इथे फक्त गप्पा मारणे(Taunting) हा उद्योग असून ह्यात बोलण्यातली ऊर्जा गुंतवून, तीन ते अधिक माणसे जुंपून, तास दोन तासात काहीच उत्पादित होत नाही.एकणूच हा बुडलेला व वाया गेलेला धंदा आहे.

म्हाता-या लोकांना विरंगुळा म्हणून ठिक आहे.पण कधीकधी हे लोक  तरुणांना घेऊन आंबट विषय चवीने सांगताना दिसतात.समोरुन येणा-या बाया-मुलींचे कितीतरी 'नजरेने बलात्कार' होताना ह्या पारांनी पाहिले असतील.  
विचार करायला गेलं तर किती नुकसान होतंय आपल्या मानव संसाधनांचे,गावाचे नि देशाचं.
मग आपण पारच नष्ट केले तर ...(विचार करुन तर पाहा)
अर्थात हा काही उपाय नाही.
मात -पराभव करणे व अरी -शत्रू...शत्रूवर मात करणारी टोळी म्हणजे मातअरी- म्हातारी.(असंच, मराठी व्याकरणाचा आधार घेतलाय.)
ही एक यशस्वीतांची टोळी म्हणूयात जी संसार,नोकरीव्यवसाय इ. ठिकाणी बरी वाईट कारकीर्द गाजवून रिटायर झालेली आहे.त्यांच्या ह्या ज्ञानाचा-अनुभवाचा उपयोग तरुणांसाठी व्हायलाच हवा.शहरामध्ये असे उपक्रम होत असतील असं वाटत नाही पण ग्रामीण भागात तर अजिबातच नाहीत.
"प्रत्येक नवीन चूक करुन अनुभव घ्यायचा म्हटलं तर आयुष्य Trial & Error मध्येच जाईल की;म्हणून इतरांच्या अनुभवातून शिका व वेळ,पैसा,एनर्जी वाचवा,"असं कोणीतरी अडीचशहाण्याने सांगून ठेवलंय.
ह्या उक्तीप्रमाणे शासनाने ह्या दोन संसाधनांची जोडगोळी बनवून योग्य वापर करुन घ्यायला हवा.

नक्की काय करता येईल पारावर?
-दर पंधरा दिवसांतून एकदा ठरलेला विषय देऊन प्रत्येक म्हाता-याने त्या विषयातील आपला अनुभव शेअर करायचा.
-आपल्याला जे कौशल्य येतं ते तरुणांना समजावून सांगणे.
-आपली नोकरी-व्यवसाय,छंद,कला,
संसारातील अशा घटना त्यांतून काय शिकलो-कसं  सामोरा गेलो,प्रवासातील अनुभव,समाजसेवा असे बरेच विषय आपणांस घेता येतील.
-त्यांच्यासाठी बसल्या जागी रोजगार निर्मिती करणे.
-तंबाखू,पान,बिडीसारख्या व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
-नवीन कौशल्ये शिकवणे.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी