दुर्गराई
*दुर्गराई*
शिवरायांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे शिलेदार म्हणजे इथले गडकिल्ले. सभोवताली असलेल्या जंगलांमधील हे किल्ले मुकुटमणीच शोभतात. सौंदर्यीक व सामरिक दृष्टीने हे जंगल किल्ल्यांसाठी अतिमहत्वाचेच.
आज आपल्या राज्यात 400+ किल्ले आहेत.सह्याद्रीच्या पट्ट्यातील किल्ल्यांना निसर्गाचा वरदहस्तच लाभला आहे.पण हल्ली कृत्रिम कारणांसाठी आज वनेच्या वने काही मिनिटांत नष्ट केली जात आहेत.
हे अवनीकरण टाळायचा एक पारंपारिक मार्ग म्हणजे देवराई .
अगदी वैदिक काळापासून निसर्ग संवर्धनाची सुरुवात आपल्याला आजही देवराईच्या स्वरुपात झालेली दिसून येते.
आपणाला प्रत्येक किल्ल्यावर कोणत्या ना कोणत्या देवतेचे मंदीर आढळून येते. तसेच किल्ल्याभोवती वृक्षांची झाडी पण दिसून येतेच.जर का ह्या वृक्षराजीला आपण देवराईसमान " *दुर्गराई* "चा दर्जा दिला तर किल्ल्याभोवतीचे जंगल किल्ल्याच्या सौंदर्यामध्ये भर घालेलच,शिवाय स्थानिकांकडून निसर्ग संवर्धन देखील होईल.निसर्ग वाचवण्यासाठी एका नवीन परंपरेची सुरवात होईल व अभयारण्य,राष्ट्रीय उद्यान यांसारखाच हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल.
Comments
Post a Comment