NSS-SSS
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार करता आज बहुतेक सर्व किल्ले दुर्लक्षित राहिले आहेत.महाराष्ट्रात हजारो महाविद्यालये असतील. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(National Service Scheme-NSS)असते पण वर्षभरातून 5-6 दिवसांसाठी एका गावात जाऊन झाडलोट व Camp firing करणे म्हणजे राष्ट्रसेवा असंच समीकरण NSS बद्दल तयार झालंय.
प्रत्येकी 2 महाविद्यालयांनी एक किल्ला व त्याच्या पायथ्याला असलेलं गाव NSSअंतर्गत शासनाचे वन विभाग-पुरातत्व विभागाच्या,ग्रामविकास विभागांच्या मार्गदर्शनाखाली व NGO'sच्या सहकार्यांने विकासासाठी घेतले तर 2 वर्षात 360 किल्ले व 360 गावांचा विकास नक्की होईल.
जे विद्यार्थी NSS ला नसतील तेही स्वप्रेरणने हे काम करु शकतात.
फक्त Man Power योग्य वेळी,योग्य ठिकाणी वापरता आली की देशाची प्रगती झालीच म्हणून समजा.
(इयत्ता नववी व अकरावीसाठी State Service Scheme सुरु करुन व्यापक स्वरुप देता येईल.)
Comments
Post a Comment