मध्यप्रदेश(madhya padesh) :Heart of India

मध्यप्रदेश :Heart of India
सांची(Sanchi) -दिवस चौथा

स्तूप पाहून सांचीमधून सकाळची 10.30ची मुंबईला जाणारी ट्रेन पकडायची होती.त्यामुळे लवकर आवरले.स्टेशनच्या बाहेरच्या चौकात नाश्ता केला.नेहमीप्रमाणे पोहेच घेतले.ह्यावेळी पोह्यांबरोबर जिलेबी पण होती ती पण फ्री.हे काॅम्बीनेशन तर भन्नाट होतं.10रुपयात पोट भरले.
खरंच किती स्वस्त आहे ना मध्यप्रदेश!
सांचीचे तिकीट काढून स्टेशनवर थांबलो.7.30ला ट्रेन आली.10मिनिटांत सांचीला उतरलो.
बाहेर रिक्षा उभा होता.त्याने साईटवर जायचे 60रु सांगीतले.पण 40रुपयावर पटवले.बहुतेक बोहनीचा टाईम असेल म्हणून काही बोलला नसावा.एक  छोटीशी टेकडी चढून वर आलो.पैसे द्यायला गेलो तर म्हणला-जब जानेका हो तो काॅल कर लेना मै आ जाऊंगा!
मी-भैया,हमारी ट्रेन 10.30बजे है!आप 10बजेतक आ जाना.
मग त्याचा नंबर घेऊन स्तूपाकडे निघालो.आमच्या समोर जगप्रसिद्ध व जागतिक वारसा स्थळ असेलेला स्तूप उभा होता.प्रत्येक भटक्याचे एक स्वप्न असतेच की,चलनी नोट व त्यावरील वास्तू समोर धरुन फोटो काढायचा. 
ofcourse,आम्ही पण केलं. मुख्य स्तूप पाहून बाकी लहानमोठे स्तूप पाहत होतो.काही पूर्ण तर काही अर्धवट होते.ह्या परिसरात श्रीलंकेच्या सरकारने एक विहार बांधून दिलीये.
तिथे आतून प्रणाम करुन बाहेर आलो.2 फॅमिली मराठीतून बोलत होत्या.मी आवाज दिला-महाराष्ट्रातून काय? 
एक जण-हो.तुम्ही कुठून?
मी-पुणे.
तो-आम्ही पण.पुण्यात कुठे?
मी-मुळशी.
त्याने लगेच मुळशी पॅटर्नच्या "अरारा अरारा"च्या डान्सची अॅक्टींग केली.तसे आम्ही सगळेच हसलो.मग जुजबी चर्चा करुन प्राणी संग्रहालयात आलो.ससे,बदक,कबुतर पोपट इ होते पण बाहेरुनच पाहता येत होते.मग फोटो घेऊन बाहेर आलो.तसं वेळेत व आरामात पाहून झाले.
रिक्षावाला बाहेरच उभा होता. स्टेशनवर आलो.त्याला 100रु दिले.भोपाळचे तिकीट काढले.ट्रेन आली.वरच्या बर्थवर बसायला जागा मिळाली.
आता आम्ही भोपाळ ते भुसावळ असं तिकीट बुक केलं, कारण सांचीवरुन भुसावळचे तिकीट मिळत नव्हते.भोपाळला गाडी थांबली.किरणने बाहेर जाऊन कसला तरी नाश्ता आणला.
आता आम्हाला स्पीपर सीट मिळाली होती.मला कंपनीमधून अर्जंट काॅल आल्याने मला उरलेला प्रवास करता येणार नव्हता.संध्याकाळी 7च्या सुमारास भुसावळमध्ये उतरलो.
3-4दिवस नाॅनवेज खाल्लं नसल्याने ते खाऊन आपापल्या वाटेने जाऊत असं ठरलं.पण त्या आधी अजिंठ्याला जाणारी एस.टी कितीला आहे हे विचारायला गेलो तर एकच एस.टी होती शेवटची.मग त्या दोघांना फर्दापूरला जाणा-या गाडीत बसवले व मी नाश्ता करायला बाहेर निघालो.तेवढ्यात क्लिक झाले की,त्या दोघांना बसवून दिलेली गाडी पुणे होती व ती गाडी पण अजिंठाजवळून फर्दापूर मार्गे जाणार आहे.पुण्याला सारख्या गाड्या चालू असतील म्हणून आपण पुणे गाडीची चौकशीच केली नाही. म्हणजे फर्दापूरला व पुण्याला जाणारी शेवटची गाडी म्हणजे हीच. मग धावत येऊन गाडीत बसलो व डायरेक्ट पुण्याचे तिकीट काढले.फर्दापूरला गाडी जेवणासाठी थांबली.तिघांनी पण जेवण केलं.माझा प्रवास चालूच राहिला.पाचच्या दरम्यान पुण्यात उतरलो.पुढे त्या दोघांनी अजिंठा, लोणार,मेहकर पूर्ण केले व मोहिम फत्ते केली.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी