18 ते 21

मुलीचे वय 18 वरुन 21वर्षे केलं.त्याबद्दल माझे मत :

1)आधी बाप असा विचार करायचा की, कधी मुलीचे वय 18 होतंय आणि मी तीचं लग्न लावून मोकळा होतोय. पण आता 21 वय केल्यावर 
बाप पहिला असा  विचार  करेल की,"असं न् तसं 21वर्षे मुलीला घरात ठेवायचीये/सांभाळयचीये तर तिला किमान 12वी शिकवू व पुढेमागे कोर्स देऊ किंवा काॅलेज जवळ असेल तर 15वी शिकवूच."
ह्याने काय होईल कि,हिमालयासारखा बाप मागे असेल तर मुली नक्कीच शिकतील.स्वतःचे ध्येय पूर्ण करतील.

-मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल.मुली त्यांच्या घरातून गावातून नाही तर Comfort zone मधून बाहेर पडतील.

2)18वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न झालं पाहिजे हा  कायदा असूनही 15-16-17वर्षे वय असताना  कितीतरी बाललग्ने ग्रामीण भागात व मागास जातींमध्ये दिसून येतात.
नविन सुधारणेने 21जाऊद्या  किमान 18-19पर्यंत तरी नक्कीच होतील.(मागील कायद्याचा बॅकलाॅग नविन सुधारणेने भरुन काढला, असे म्हणता येईल.)

-18वय म्हणजे मुलगीच काय मुलीच्या बापाने पण 'जग बघीतलेलं नसेल'.त्यामुळे जरा त्यांना सामाजिक- व्यवहारिकदृष्ट्या Mature होऊद्या, बाहेरच्या जगाशी अपडेट राहूद्या.

-18-19 हे वय बाळंतपणासाठी योग्य नाही,हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालंच आहे.कमी वयात मातृत्वाची जबाबदारी पडल्यावर अकाली वृद्धत्व आलेलं दिसते.

-उच्च शिक्षणाने मुलींना स्वावलंबी होण्यास मदत होईल.मुलींनो काम करत शिका पण नक्की शिका.

-मी तर म्हणतो मुलींनी Graduation करावं(21वय),किमान 1वर्षे जाॅब करावा (22वय)व त्यातून स्वतःच्या लग्नखर्चास हातभार लावावा.
म्हणजे लग्नाचे वय 22करावं.

-हल्ली जो-तो म्हणतोय मुली बिघडल्यात. अरे मुर्खांनो मुले पण बिघडलीतच की.किंबहुना मुलांच्या संपर्कातूनच मुली बिघडत असाव्यात.
खरं तर मुलांचे लग्नाचे वय 18-19 करायला पाहिजे.

-सोशल मिडियावर 99.9999% लोकांनी ह्या सुधारणेला विरोध केला आहे.त्यात महिला पण आहेतच.
त्यातील महत्वाचा मुद्दा असा की,
मुली पळून जातील,आई-वडिलांचे टेन्शन 3वर्ष जास्त वाढेल.त्यांना उच्च शिक्षणाचा खर्च झेपेल का? इ....
हल्ली आपण बघतो की आई ही मुलीची बेस्ट फ्रेंड आहे.त्यांचे Sharing-Bonding घट्ट आहे कारण त्यात सर्व प्रकारचा Franknessआहे.
आई-वडिलांनी आपल्या मुलींवर डोळस विश्वास दाखवायचा आहे व मुलींनी मिळालेल्या संधीचा फायदा उचलत 3 वर्षांमध्ये ध्येयावर मार्गक्रमणा करत स्वतःला सिद्ध करुन दाखवायचे आहे.

-लग्नाचे वय तर योग्य पाहिजेच पण तो जीवनसाथीही योग्य पाहिजेच.
खरं प्रेम शेवटपर्यंत राहणार असेल तर 21 वर्षापर्यंत नक्कीच राहिल.
All the best my friends-sisters.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी