एक दिवस शाळेसाठी

13 Oct 2016
"एक दिवस शाळेसाठी"
ह्या स्वयंघोषित उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात असलेल्या मुळशी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर झालो.(चांगल्या कामासाठी मुहूर्त लागत नाही कारण दसरा कधी आला नि गेला ते पण कळाले नाही.)
परिपाठ झाल्यावर चौथीच्या वर्गावर इतिहास शिकवायला गेलो.पाहतो तर फक्त 8 विद्यार्थी.बहुधा फॅमिली प्लॅनिंग(strike rate कमी झाला) आणि इंग्लिश मिडियमचे फॅड ही कारणे असावीत.आमच्या वेळेस तर प्रत्येक वर्गात 40-45 जण तर हमखास असायचे(उगाच नाही भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसरया नंबरवर आहे.)
शिवाजी महाराजांबद्दल मुलांना खूप कमी माहिती होती किंवा 10 वर्षाच्या मुलांकडून माझी अपेक्षा जास्त असावी. पुण्यामध्ये लालमहाल, सारसबाग, शनिवारवाडा आहे हे 8 विद्यार्थ्यांमध्ये फक्त एका मुलीला माहित होते.
ते स्वतः राहत असलेल्या मुळशी तालुक्याविषयी त्यांना अक्षरशः काहीच माहिती नव्हती.
चाॅकलेट खाल्यावर कागदाचे काय करता असे विचारले असता फेकून देतो असे 'नॅचरल'  उत्तर सर्वानी दिले. मग रस्त्यावरचा कचरा उचलू शकत नाही तर किमान कचरा तरी करणार नाही.यासाठी स्वतःचा कचरा स्वतःजवळ ठेवून नंतर कचरापेटीत टाकण्याचे सुचविले.ते त्यांना पटले.मध्येच एका मुलाला सुसुला जायचे होते म्हणून उभा राहून म्हणाला,"May I go to latrine sir?"मी थोडा हँगच  झालो ना.मग जायला सांगीतले. कारण अशा ग्रामीण भागात लहान मुलांकडून असे स्टँडर्ड इंग्लिश ऐकणे म्हणजे कान संतुष्टच होतात .(मी latrine शब्द 11वी ला  नवोदय विद्यालयात असताना पहिल्यांदा ऐकलेला.)आपल्या आई वडिलांकडे किल्ले पाहण्यासाठी आग्रह धरण्याचा व खूप फिरण्याचा सल्ला दिला. कोलगेट वापरु नका चहा पिऊ नका दूध प्या,लाईफबाॅय -लक्स सारखे परदेशी साबण वापरु नका; असा थोडाफार स्वदेशीचा मंत्र देऊन ऑफिसमध्ये गेलो तर एकाचं गणित चुकले म्हणून मुख्याध्यापक एकाला प्रसाद देत होते.मग त्यांना माझी "ज्ञानरचनावादी सहलीची" संकल्पना समजावून सांगीतली पण प्रशासकीय झंझटचे कारण सांगून त्यांनी जागच्या जागी सुरुंगच लावला. महिन्यातून दोन दिवस येत जाईल, असे आश्वासन देऊन निघालो.
आज एक गोष्ट कळाली की Global Citizen बनण्यासाठी इंग्लिश भाषा आत्मसात करणारे स्वतःच्या इतिहास-भूगोलापासून अनभिज्ञ आहेत.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी