NDA

17 Sept 2016
सर्वाना विनंती की ट्रेनिंगसाठी आपल्या गावातून ये-जा करणारया NDAच्या विद्यार्थ्याना-सैनिकांना माणूसकीच्या दृष्टीकोनातून मदत करावी. काल रात्री आमच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या सैनिकांना  पाणी देऊ केलं रस्ता दाखवला... देशसेवा केल्याचं समाधान झालं.
आज पहाटे 4.30 वा एक तुकडी गावातील एका माणसाला विनंती करित होती की आमच्यातील दोघे जण खूप दमलेले आहेत.इतके की त्याना चालणे अशक्यच आहे.एवढ्या ओझ्यासह त्यांना चालणे अवघड आहे.तुमच्या गाडीतून आम्हाला गोंधळवाडीला सोडा तिथे आमची गाडी आहे. पण हा माणूस घाबरला असावा उगाच मिलिटरीने आपली गाडी जप्त वगैरे केली तर??
ह्याने नकार दिला.त्यांनी सामानाची अदलाबदल केली त्या दोघांना 2-2खांदे दिले आणि पावसात पुढे चालू लागले.लाज वाटते आपल्या अशा वागणूकीमुळे त्याना नक्कीच प्रश्न पडला असेल आपण इतके खडतर कष्ट करतोय पण  कुणाला त्याची जाणच नाही कदरच नाही.अशा लोकांसाठी आपले कष्ट वाया तर नाही ना गेले?
 खरंच विचार करा मित्रहो,मिसरुडही न फुटलेली घरादाराचा त्याग करुन भारताच्या कानाकोपरयातून देशसेवेसाठी आलेली ही मुलं.सणवार,ऊन- वारा-पाऊस काही बघत नाहीत.ते आज सीमेवर रात्रंदिन पहारा देतात म्हणून आपण सुखाने झोपतोय. 
मान्य आहे ट्रेनिंग आहे त्यांचे; पण ते पण माणूसच आहेत ना. त्यांनाही दुःख कष्ट यातना होतच असतील ना.
सलाम त्यांच्या कष्टाला,जिद्दीला व देशभक्तीला.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी