Posts

रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस तिसरा

Image
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस तिसरा  सकाळी लवकर उठून आवरले.चौल गावातील हमामखाना पाहायचा होता.छोटासा रस्ता,आजूबाजूला वाडी,घरे मस्त वाटत होतं सगळं.हमामखाना ही वास्तू ह्या लोकांना माहितच नव्हती.फक्त एका माणसाने अचूक सांगीतले.हमामखानाकडे पाहून ही मुघलकालीन वास्तू आहे, हे कोणीही सांगू शकेल. हमामखाना चांगला प्रशस्त होता.मधोमध swimming Pool होता.एका कोप-यात कपडे बदलण्यासाठी जागा होती.इतकी छान वास्तू पण वटवाघळांचे माहेरघर होतं.कोळ्यांच्या जाळांचं अभेद्य कवच मोडून आम्हाला आत जावं लागले होते.(हमामखान्याचे फोटो वटवाघळांच्या नादात नाही काढता आले.)जवळच असणा-या एका देवीच्या मंदीरात गेलो व दर्शन घेऊन आलो. नंतर आम्ही गावाच्या बाहेर आडरानात असणा-या कलावंतीणीच्या वाड्याकडे निघालो.ही वास्तू ब-याच लोकांना माहित होती.पूर्वीच्या घाटमार्गावरील व्यापा-यांच्या करमणूकीचे ठिकाण होते;बाकी नावावरुन अर्थबोध होईलच. हा कलावंतीणीचा वाडा आता परत फिरुन आम्ही रेवदंड्याच्या किल्ल्याकडे निघालो.मग आठवले की अरे रामेश्वर मंदीर पाहायचे राहिलंय.मग मंदीराकडे आलो.कोकणी पद्धतीचे बांधकाम असलेलं मंदीर नजर खिळवून ठे...

रायगड जिल्हा दर्शन मोहिम:दिवस पहिला

Image
Plus Valley,Tamhini Sanctuary Welcome Ballaleshwar Ganpati विनोबाजींचे घर खाडीच्या पूलावरुन रायगड जिल्हा दर्शन मोहिम: दिवस पहिला(आणि रात्र पण पहिलीच) काल लोहगड-कार्ला-भाजे करुन रुमवर यायला 10 वाजलेले.खूप दमलेलो.त्यामुळे उठायला उशीर झाला आणि पहिल्याच दिवशी प्लॅनिंगला सुरुंग लागला. 6 वाजता निघायचा Plan होता(कारण दुपारचे ऊन टाळून आराम करण्यासाठी पहाटे जास्तीतजास्त घोडदौड करायची) पण प्रत्यक्षात पुण्यातून निघताना 8 वाजले.चक्क 2 तास लेट होतो आम्ही;6-7दिवसाचा प्लॅन आहे; 8-10 दिवस लागतील की काय अशी शंका चाटून गेली.                वनाझला नाश्ता केला आणि  ठरल्याप्रमाणे बोर घाटाऐवजी बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन श्रीगणेशा करावा म्हणून  ताम्हीणी घाटाकडे कूच केली.मे महिन्यातील सकाळी 9चे ऊन पण लय कडक होते.चांदणी चौक(CC) मध्ये गाॅगल घ्यायला थांबलो.आमच्याकडे सुट्टे नव्हते.त्यात 15-20मिनिटे गेली.पिरंगुट आलं आणि मी तोंडाला रुमाल बांधला कारण घरच्यांना/नातेवाईकांना दिसायचे ...

रायगड जिल्हा दर्शन : दिवस दुसरा

Image
किल्ल्यातील तुळशी वृंदावन मावशी काकांचे काॅलेज दुतर्फा झाडी गाडी उतरवताना शिल्पालय सरखेलांची समाधी काल 150किमी प्रवास झालेला पण रात्री चांगली झोप मिळाली म्हणून आज चांगले फ्रेश वाटत होते. सकाळी 6.30 उठून सगळे आवरले.मित्रानेच चहा घेतला(मी काॅफी घेतो) व निघालो.पहिला मोर्चा सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीकडे वळवला.जाऊन बघतोय तर कुलूप.लय लवकर आलेलो ना.मग तिथे एकाला विचारले," कधी उघडणार? तो म्हणला आहे एक जण येईल इतक्यात."5-10मिनिटांत एक सायकलस्वार आला.त्याने कुलूप उघडले व आम्ही आत शिरलो. त्याच्याकडून थोडी माहिती घेतली व समाधीचे दर्शन घेऊन, फोटो काढून निघालो.नाश्ता न करता फक्त ज्यूस प्यायलो.बीचवर जाऊन कुलाबा किल्ला पाहायचा होता म्हणून बीचवर आलो.भरती होती.बोटीवाले वाढीव रेट सांगत होते. त्यातील एक जण आमची गरीब परिस्थिती पाहून म्हणला," संध्याकाळी ये,चालत चालत जाशील किल्ल्यावर." मग आम्ही पण तसंच ठरवले.वेधशाळा पाहण्याचे वेध लहानपणापासूनच लागलेले(भूगोलच्या पुस्तकातला फोटो).वेधशाळे...

5 वर्षे Quarantine

5वर्षे क्वारंटाईन ग्रामीण भागातील बहुतेक सर्व व शहरी भागातील 30% अशिक्षित व  सुशिक्षित महिला-मुली मासिक पाळीमध्ये प्रत्येक महिन्यातील 5 दिवस ह्याप्रमाणे वर्षाचे 60 दिवस म्हणजेच पूर्ण दोन महिने क्वारंटाईन असतात.(फरक लक्षात घ्या मित्रहो कोरोनातील खाऊन पिऊन राहिलेलं  क्वारंटाईन वेगळं.) जवळपास 15 ते 45 ह्या 30वर्षात पूर्ण 5 वर्षे क्वारंटाईन.इमॅजिन करुन पाहा की तुम्हाला कोण तरी सांगतंय(स्वतःहून नाही) की, तुझ्या आयुष्यातील पाच वर्षे तू जगायचेच नाही... लेडिजांनो,खरंच धन्य आहात. मानले तुम्हांला. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 काही गोष्टी काळानुसार बदलायला हव्यात. अर्थात ह्या प्रथेचे मी समर्थन करत नाही.महिन्यातून पाच दिवस जगणे हिरावून घेणारी क्वारंटाईन करणारी ही प्रथा त्या काळी थोड्याफार प्रमाणात योग्यच होती. देवाची भीती दाखवली नसती तर ही प्रथा नसती पडली.कारण त्याकाळी लोक फक्त देवाला व भूतालाच घाबरायचे.असो.कोणत्या का कारणाने महिलांना आराम मिळाला हे बेस्ट झाले.(म्हणजे तुम्ही गणिती क्रियांसाठी पाढे वापरा किंवा गुणाकार भागाकार करा.Result Matters.) हळूहळू ह्यात सकारात्मक बदल होताना द...

दुर्गराई

*दुर्गराई*   शिवरायांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे शिलेदार म्हणजे इथले गडकिल्ले. सभोवताली असलेल्या जंगलांमधील हे किल्ले मुकुटमणीच शोभतात. सौंदर्यीक व सामरिक दृष्टीने हे जंगल किल्ल्यांसाठी अतिमहत्वाचेच. आज आपल्या राज्यात 400+ किल्ले आहेत.सह्याद्रीच्या पट्ट्यातील किल्ल्यांना निसर्गाचा वरदहस्तच लाभला आहे.पण हल्ली कृत्रिम कारणांसाठी आज वनेच्या वने काही मिनिटांत नष्ट केली जात आहेत. हे अवनीकरण टाळायचा एक पारंपारिक मार्ग म्हणजे देवराई . अगदी वैदिक काळापासून निसर्ग संवर्धनाची सुरुवात आपल्याला आजही देवराईच्या स्वरुपात झालेली दिसून येते. आपणाला प्रत्येक किल्ल्यावर कोणत्या ना कोणत्या देवतेचे मंदीर आढळून येते. तसेच किल्ल्याभोवती वृक्षांची झाडी पण दिसून येतेच.जर का ह्या वृक्षराजीला आपण देवराईसमान " *दुर्गराई* "चा दर्जा दिला तर किल्ल्याभोवतीचे जंगल किल्ल्याच्या सौंदर्यामध्ये भर घालेलच,शिवाय स्थानिकांकडून निसर्ग संवर्धन देखील होईल.निसर्ग वाचवण्यासाठी एका नवीन परंपरेची सुरवात होईल व अभयारण्य,राष्ट्रीय उद्यान यांसारखाच हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल.

पार

झाडाभोवतीचे पार नष्ट केले तर..... पूर्वीच्या काळी झाडाभोवतीच्या पाराचा जुजबी उपयोग माहित आहे. तेव्हापासून ते आता पर्यंत गावातील पारावर काय दिसते आपल्याला?? एखादा म्हातारा सुनेची कटकट नको म्हणून आपल्या नातू-नातीला घेऊन खेळवताना दिसतो,तोच मग येणा-या जाणा-याला अडवतो व इतरांचा वेळ खर्च करतो. तरुणांचा घोळका आधीच गप्पा मारत असेल तर त्यांना म्हाता-या लोकांचा अडसर होतो व ते जागा बदलतात. विषयाची सुरवात गल्ली, गाव,शेजारचे गाव,तालुका ते देश अशा कोणत्याही ठिकाणापासून होते. ह्यात ख-या माहितीचा अभाव दिसून येतो.बातम्या रंगवून सांगीतल्या जातात.जवळून येणारा-जाणा-या एखादा/एखादीची 'चारित्र्याची कुंडली'च जाहीर केली जाते. कधीकधी त्याला पण गप्पांमध्ये सामावून घेतले जाते. इथे फक्त गप्पा मारणे(Taunting) हा उद्योग असून ह्यात बोलण्यातली ऊर्जा गुंतवून, तीन ते अधिक माणसे जुंपून, तास दोन तासात काहीच उत्पादित होत नाही.एकणूच हा बुडलेला व वाया गेलेला धंदा आहे. म्हाता-या लोकांना विरंगुळा म्हणून ठिक आहे.पण कधीकधी हे लोक  तरुणांना घेऊन आंबट विषय चवीने सांगताना दिसतात.समोरुन येणा-या बाया-मुलींचे कितीतरी 'नजरे...

NSS-SSS

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार करता आज बहुतेक सर्व किल्ले दुर्लक्षित राहिले आहेत.महाराष्ट्रात हजारो महाविद्यालये असतील. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(National Service Scheme-NSS)असते पण वर्षभरातून 5-6 दिवसांसाठी एका गावात जाऊन झाडलोट व Camp firing करणे म्हणजे राष्ट्रसेवा असंच समीकरण NSS बद्दल तयार झालंय. प्रत्येकी 2 महाविद्यालयांनी एक किल्ला व त्याच्या पायथ्याला असलेलं गाव  NSSअंतर्गत शासनाचे वन विभाग-पुरातत्व विभागाच्या,ग्रामविकास विभागांच्या मार्गदर्शनाखाली व NGO'sच्या सहकार्यांने विकासासाठी घेतले तर 2 वर्षात 360 किल्ले व 360 गावांचा विकास नक्की होईल. जे विद्यार्थी NSS ला नसतील तेही स्वप्रेरणने हे काम करु शकतात. फक्त Man Power योग्य वेळी,योग्य ठिकाणी वापरता आली की देशाची प्रगती झालीच म्हणून समजा. (इयत्ता नववी व  अकरावीसाठी State Service Scheme  सुरु करुन व्यापक स्वरुप देता येईल.)