Posts

सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India (दिवस दुसरा)

Image
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व इंदौर  26/10/2019 -दिवस दुसरा आज सकाळी 9.30 ला उठलो.फक्त 4 तास झोप झाली. तितकी पुरेशी नव्हती पण गरजेची होतीच. बाकी दोघांना पण उठवले.निवांत आवरले व समोर असलेल्या एका हाॅटेलमध्ये नाश्ता करायला गेलो.इकडे इंदोरी पोहा फेमस आहे ऐकले होते.मग पोहेच ऑर्डर केले. इथे पहिल्यांदाच पोह्यामध्ये बडीशेप पाहिली.अजून कसला तरी फ्लेवर असावा पण; ओळखता आला नाही.छान होते चवीला.आवडलं. तसं पाहायला गेलं तर पाककलेतील कांदापोहे ह्या पदार्थावर सगळ्यात जास्त प्रयोग होत असलेले दिसून येतात.नाव कांदापोहे पण हल्ली काळानुसार त्यात बटाटा,मटार इ दिसून येतंच. आधी पोटोबा मग विठोबा,ह्या न्यायाने पोट भरुन घेतले व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगकडे  जाणा-या गाडीत बसलो.(आतापर्यंत  घृष्णेश्वर,त्र्यंबकेश्वर,भीमाशंकर ही ज्योतिर्लिंगे झालीत.ह्या सहलीत अजून दोन होतील.) गाडी रिकामीच.पण वेळेवर निघाली.लेडीजसाठी उजव्या बाजूच्या सीट्स राखीव होत्या व हे कंडक्टर पुरुषांना उठवून लेडीजसाठी जागा करुन देत होते. एका गाडीत 2-3 कंडक्टर(क्लिनर) दिसत होते(कसं काय परवडत असेल काय माहित राव?) ह्यांचा आपल्यासा...

सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India

Image
मध्यप्रदेश -Heart of India मे 2018ची रायगड जिल्हा दर्शन सहल सफल झाली आणि अजून एक जिल्हा करु शकतो असा आत्मविश्वास माझा मलाच आला. रत्नागिरी जिल्हा करायचा ठरवलं(एकट्यानेच). प्लॅन रेडी झाला.प्रयाणाची(नीट वाचा नाय तर प्रणय वाचाल घाईत) तारीख पण फिक्स केली.20 ऑक्टोबर.8दिवस.ह्या वेळचा पार्टनर किरण होता.पण झालं काय,भावाने सुचविलेल्या एका कंपनीमध्ये जाॅईन झालो आणि सगळा फियास्को'च झाला ट्रीपचा.मग पुन्हा ठरवले, उन्हाळ्यात भारतातील एक पूर्ण राज्य फिरायचे व  दिवाळीत महाराष्ट्रातील एक पूर्ण जिल्हा. एक वर्ष असंच गेलं.मग म्हटले की,ह्या दिवाळीत तरी सीमोल्लंघन केलंच पाहिजे.ऑगस्टमध्ये चार दिवस गुजरातला मुक्काम करुन आलेलो पण घंटा कुछ देखा नही.असले सीमोल्लंघन काय कामाचे ना? खानदेशातून मुसंडी मारुन नर्मदेपार मध्यप्रदेशात चढाई करायचा विचार केला. देडे सर व किरण दोघे पण तयार झाले. मला सुट्टी नव्हती म्हणून दिवाळीच्या सुट्टीमध्येच कार्यभाग साधून घ्यायचा होता(uffff, yeh private job bhi na.) उत्तरेत नांदगावच्या(जि.नाशिक) वर गेलो नव्हतो कधी.त्यामुळे अंदाजावरच प्लॅन होता.गुगलकडून गरजेपुरती माहिती घेतली होती. 25 त...

रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस सहावा

Image
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस सहावा आज सकाळी निवांत उठलो,सगळं निवांतच आवरले.महाडजवळचे सव येथील कुंड व गांधारपाले लेणी करुन निघणार होतो.पण मोहनने वाळेणकुंड बद्दल सांगीतले व आधी तिकडे निघालो. मी व मोहन एका गाडीवर आणि देडे सर व विलास(मोहनचा भाऊ) दुस-या गाडीवर. नदीच्या कुंडामध्ये(खोलगट भागात)खायला टाकल्यावर मोठाले मासे येत असतात,तेच पाहायचं होतं.रस्त्याच्या कडेला गाडी लावली व    उन्हाळ्यात कोकणातील इतर नद्यांप्रमाणे कातळखडक उघडे पडलेली कोरडीठक्क नदी पाहत होतो.(दोनच महिन्यांनी ह्या नदीचा पावसाळ्यातील फोटो whats appला पाहिला. भयानकच म्हणता येईल.) मग लोखंडी पूल ओलांडून देवीच्या दर्शनासाठी गेलो.खायला घेऊन गेलतो पण थोडं लेट झाल्यामुळे उन्हात मासे बाहेर येत नाहीत असं स्पष्टीकरण मोहन व विलासने दिले.मग फोटोसेशन करुन लेण्यांकडे मोर्चा वळवला.जाताना मोहनची खरवलीची जागा पाहिली. लेण्यांकडे जाण्यासाठी नवीनच बांधकाम केलेल्या दगडी पाय-या दिसत होत्या.लेण्या कोरीव नव्हत्या.गुंफा म्हणता येईल. काम अपूर्ण राहिलेलं असावं.लेणी पाहून  झाल्यावर मोहन म्हणला," सवला...

रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस पाचवा

Image
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस पाचवा काल बरेच दमलेलो.साहजिकच उठायला उशीर झाला.सगळे आवरुन 8वाजता बाहेर पडलो. मुरुडला जाताना एका हाॅटेलमध्ये नाश्ता केला व मुरुडच्या बीचवर आलो.पण आधीच अंघोळ केल्यामुळे समुद्रात भिजायचा प्रश्नच नव्हता  येताना गर्द झाडीमध्ये वसलेले केशवराज मंदीर पाहिले. जवळच असलेले व्याघ्रेश्वर मंदीर व झोलाईदेवीचे मंदीर पाहिले.  10.30 ला चेकआऊट करायचे होते.वेळ नव्हता म्हणून दर्शन घाईघाईत घेतले व  हाॅटेलवर आलो.फ्रेश होऊन चेकआऊट केले.आता आमचा मोर्चा तामसतीर्थ बीचकडे वळवला. इथे  ओहोटी असल्यामुळे पाणी लालसर दिसले नाही.अजून कोणता तरी बीच पाहिला.एके ठिकाणी वडापाव खाल्ले.  महाडच्या रुपेशदादांनी सांगीतल्यामुळे दाभोळ व जवळपासची स्थळे सहलीत समाविष्ट केली.नाहीतर दापोली करुनच माघारी फिरणार होतो.गुगलबाबांनी दाभोळला जाण्यासाठी आमच्या ठिकाणावरुन सरळ जाणारा बीचच्या कडेचा एक मार्ग दाखवला व दुसरा परत दापोलीला येऊन दाभोळकडे जाणारा.अर्थात आम्ही बीचच्या कडेचा मार्ग निवडला. ब्लॅकने पेट्रोल घेतले 200रुपयाचे व गाडी दाभोळ के दि...

रायगड जिल्हा दर्शन मोहिम:दिवस चौथा

Image
सकाळी नाश्ता करुन निघालो.काल रात्री ज्या रस्त्याने जीव मुठीत धरुन प्रवास केला, आज तो रस्ता संपू नये असे वाटत होतं.खड्डा नाही,दोन्ही बाजूने जंगल,रस्त्यावर अधूनमधून आलेली सावली,वळणदार रस्ते,वाहनांची वर्दळ नाही. श्रीवर्धनला पोचलो.इतिहासातील माझे आवडते व्यक्तीमत्व शूरवीर श्रीमंत पेशवे बाजीराव पेशवे यांच्या मूळ निवासस्थानी गेलो. इथे श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन निघालो. पेशवे सरकारांचे मूळ स्थान जवळच असलेल्या मंदीरात पाया पडलो.ग्रामदैवताच्या पाया पडलो व बीचकडे निघालो.वाटेत जाताना सुपारी संशोधन केंद्र दिसले.म्हटले पाहूयात काय करतात ते.आत गेलो,तिथे महालदार सर होते.त्यांना सांगीतले की फिरायलो आलोय इकडे आणि आता सुपारीबदल माहिती हवीये.मग मी प्रश्न विचारायचो ते उत्तर द्यायचे.त्यांचे उत्तर संपेपर्यंत माझा प्रश्न तयारच असायचा.20मिनिटांत खूप छान माहिती मिळाली.मग त्यांची परवानगी घेऊन परिसर पाहायला गेलो.अननसाचे झाड मी 7वी ला असताना स्वतः लावलेलं त्यावर आज पाहत होतो.मित्र तर पहिल्यांदाच पाहत होता.सुपारीच्या वाडीत आंतरपिकांवर पण संशोधन चालू होतं.फोटो घेऊन निघालो. ...

रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस तिसरा

Image
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस तिसरा  सकाळी लवकर उठून आवरले.चौल गावातील हमामखाना पाहायचा होता.छोटासा रस्ता,आजूबाजूला वाडी,घरे मस्त वाटत होतं सगळं.हमामखाना ही वास्तू ह्या लोकांना माहितच नव्हती.फक्त एका माणसाने अचूक सांगीतले.हमामखानाकडे पाहून ही मुघलकालीन वास्तू आहे, हे कोणीही सांगू शकेल. हमामखाना चांगला प्रशस्त होता.मधोमध swimming Pool होता.एका कोप-यात कपडे बदलण्यासाठी जागा होती.इतकी छान वास्तू पण वटवाघळांचे माहेरघर होतं.कोळ्यांच्या जाळांचं अभेद्य कवच मोडून आम्हाला आत जावं लागले होते.(हमामखान्याचे फोटो वटवाघळांच्या नादात नाही काढता आले.)जवळच असणा-या एका देवीच्या मंदीरात गेलो व दर्शन घेऊन आलो. नंतर आम्ही गावाच्या बाहेर आडरानात असणा-या कलावंतीणीच्या वाड्याकडे निघालो.ही वास्तू ब-याच लोकांना माहित होती.पूर्वीच्या घाटमार्गावरील व्यापा-यांच्या करमणूकीचे ठिकाण होते;बाकी नावावरुन अर्थबोध होईलच. हा कलावंतीणीचा वाडा आता परत फिरुन आम्ही रेवदंड्याच्या किल्ल्याकडे निघालो.मग आठवले की अरे रामेश्वर मंदीर पाहायचे राहिलंय.मग मंदीराकडे आलो.कोकणी पद्धतीचे बांधकाम असलेलं मंदीर नजर खिळवून ठे...