Posts

Right to pee in three walls

International Men's Day निमित्त तीन भिंतींमध्ये उभे राहून मुतण्याचा हक्क. Right to pee in three walls. Prati, MH.sarkar ,Kendra sarkar,uno, feminism puraskarte etc. Dear all, Patras karan ki lay jorat lagleli pn purushanchi mutari ky ghavena.mg athavle amhi pn Gadi aslo tari manusch ahot.amhala pn mutay lagtech ki.amhala 4 bhinti nh pn 3 bhintit ubhe rahun mutaycha purn hakk ahe. Amhala pn kutehi ubhe rahun kontyahi jhadala urea khat denyat mardangi nahi tr laajach vatate.pn tumhi sarvani purush mhnje nirlajjam-sadasukhi asech gruhit dharlay. Amhi purush mhnje manusch ahot na.. amhala pn  aatma sanman,laaj lajja sharam etc bhavna ahetch ki...Purushakade Nirlajj Manus mhnun pahaychi vrutti pravrutti soda. Baghav tikde ladies toilet.are mg amhi kute ughadyavarch dhhar maraychi ka?are bandha na 3×3×3 chi kholi. kute rahiloch ubhe dhaar marayla tr tond vakde karun amhala Bloody Indian mhnun amchya  gharanyasah sanskruti cha uddhar karnarch. sarkar la pn tech abhipret ahe as distay...

फलक

Image
हे पाहा,सरकारी कामाच्या अडाणीपणाचे व ढकलाढकलीचे मूर्तीमंत उदाहरण ! पाली -खोपोली रस्त्याचे काम चालू आहे व त्या मार्गावर असंख्य खड्डे आहेत व फक्त चार-पाच फलक आहेत. त्यावर काय लिहिलंय पाहा- "पुढे खोल खड्डा आहे,वाहने सावकाश चालवा.ताशी वेग 20किमी." अरे मूर्खांनो, एखाद्याचा जीव घेतील अशी अर्धवट कामे करताच कशाला?? आणि असा एक  फलक बनवायला 1000-1500रुपये खर्च आला असेल, त्यात असे 10-15 खड्डे आरामात भरुन निघाले असते ना बावळटांनो.जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग करतंय हे हरामखोर सरकार आणि भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम विभाग. आणि ताशी वेग 20किमी सांगीतलंय.म्हणजे आम्ही घरी पोचायचंच नाही का???(पैज लावून चालून दाखवा.)

मध्यप्रदेश(madhya padesh) :Heart of India

Image
मध्यप्रदेश :Heart of India सांची(Sanchi) -दिवस चौथा स्तूप पाहून सांचीमधून सकाळची 10.30ची मुंबईला जाणारी ट्रेन पकडायची होती.त्यामुळे लवकर आवरले.स्टेशनच्या बाहेरच्या चौकात नाश्ता केला.नेहमीप्रमाणे पोहेच घेतले.ह्यावेळी पोह्यांबरोबर जिलेबी पण होती ती पण फ्री.हे काॅम्बीनेशन तर भन्नाट होतं.10रुपयात पोट भरले. खरंच किती स्वस्त आहे ना मध्यप्रदेश! सांचीचे तिकीट काढून स्टेशनवर थांबलो.7.30ला ट्रेन आली.10मिनिटांत सांचीला उतरलो. बाहेर रिक्षा उभा होता.त्याने साईटवर जायचे 60रु सांगीतले.पण 40रुपयावर पटवले.बहुतेक बोहनीचा टाईम असेल म्हणून काही बोलला नसावा.एक  छोटीशी टेकडी चढून वर आलो.पैसे द्यायला गेलो तर म्हणला-जब जानेका हो तो काॅल कर लेना मै आ जाऊंगा! मी-भैया,हमारी ट्रेन 10.30बजे है!आप 10बजेतक आ जाना. मग त्याचा नंबर घेऊन स्तूपाकडे निघालो.आमच्या समोर जगप्रसिद्ध व जागतिक वारसा स्थळ असेलेला स्तूप उभा होता.प्रत्येक भटक्याचे एक स्वप्न असतेच की,चलनी नोट व त्यावरील वास्तू समोर धरुन फोटो काढायचा.  ofcourse,आम्ही पण केलं. मुख्य स्तूप पाहून बाकी लहानमोठे स्...

मध्यप्रदेश-Heart of India

Image
सीमोल्लंघन : मध्यप्रदेश -Heart of India  दिवस तिसरा-उज्जैन  27/10/2019 सकाळी 6वाजता उठलो  व आवरुन 7वाजता बाहेर पडलो. आम्ही 2 तास उशिराने checkout करत होतो. हाॅटेलवाल्याने 100रुपये मागितले.50टेकवले व पण काय ऐकला नाही. शेवटी दिले 100रुपये व बाहेर पडलो. कालच्याच हाॅटेलमध्ये पोहे खाल्ले. मग उज्जैनला जाणा-या बसमध्ये बसलो.इतक्या सकाळी ट्रॅफिक नव्हते.इंदोर शहर झोपेत असतानाच इंदोरचा निरोप घेतला.बायबाय. तासाभरात पोचलो असू.रिक्षाने मंदीराच्या बाहेर येऊन पोहोचलो. आरतीची वेळ झाली होती.जवळपास तासाभराने महाकालेश्वराचे दर्शन झाले.लाडूचा प्रसाद घेऊन बाहेर आलो.एके ठिकाणी मोफत महाप्रसादाची पाटी दिसली.पोहे पण जिरले असावेत.म्हटले देवाचा प्रसाद आहे,खाल्लाच पाहिजे.मग कुपनच्या रांगेत उभे राहिलो.आतील एक पंगत उठून बाहेर आली तेव्हा आम्हाला आत जाता आले.कमालीची शिस्त दिसत होती इथे.दुपारचे इथेच झाले. मग शैलेशने कालभैरवांना दारु तीर्थ म्हणून दिली जाते तो व्हिडिओ पाठवलेला होता.रिक्शा करुन कालभैरव मंदीरात आलो.क्षिप्रा नदी संथपणे वाहत होती. आपण जसं शनि देवाला तेल वाहतो,अगदी तसंच क...

सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India (दिवस दुसरा)

Image
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व इंदौर  26/10/2019 -दिवस दुसरा आज सकाळी 9.30 ला उठलो.फक्त 4 तास झोप झाली. तितकी पुरेशी नव्हती पण गरजेची होतीच. बाकी दोघांना पण उठवले.निवांत आवरले व समोर असलेल्या एका हाॅटेलमध्ये नाश्ता करायला गेलो.इकडे इंदोरी पोहा फेमस आहे ऐकले होते.मग पोहेच ऑर्डर केले. इथे पहिल्यांदाच पोह्यामध्ये बडीशेप पाहिली.अजून कसला तरी फ्लेवर असावा पण; ओळखता आला नाही.छान होते चवीला.आवडलं. तसं पाहायला गेलं तर पाककलेतील कांदापोहे ह्या पदार्थावर सगळ्यात जास्त प्रयोग होत असलेले दिसून येतात.नाव कांदापोहे पण हल्ली काळानुसार त्यात बटाटा,मटार इ दिसून येतंच. आधी पोटोबा मग विठोबा,ह्या न्यायाने पोट भरुन घेतले व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगकडे  जाणा-या गाडीत बसलो.(आतापर्यंत  घृष्णेश्वर,त्र्यंबकेश्वर,भीमाशंकर ही ज्योतिर्लिंगे झालीत.ह्या सहलीत अजून दोन होतील.) गाडी रिकामीच.पण वेळेवर निघाली.लेडीजसाठी उजव्या बाजूच्या सीट्स राखीव होत्या व हे कंडक्टर पुरुषांना उठवून लेडीजसाठी जागा करुन देत होते. एका गाडीत 2-3 कंडक्टर(क्लिनर) दिसत होते(कसं काय परवडत असेल काय माहित राव?) ह्यांचा आपल्यासा...

सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India

Image
मध्यप्रदेश -Heart of India मे 2018ची रायगड जिल्हा दर्शन सहल सफल झाली आणि अजून एक जिल्हा करु शकतो असा आत्मविश्वास माझा मलाच आला. रत्नागिरी जिल्हा करायचा ठरवलं(एकट्यानेच). प्लॅन रेडी झाला.प्रयाणाची(नीट वाचा नाय तर प्रणय वाचाल घाईत) तारीख पण फिक्स केली.20 ऑक्टोबर.8दिवस.ह्या वेळचा पार्टनर किरण होता.पण झालं काय,भावाने सुचविलेल्या एका कंपनीमध्ये जाॅईन झालो आणि सगळा फियास्को'च झाला ट्रीपचा.मग पुन्हा ठरवले, उन्हाळ्यात भारतातील एक पूर्ण राज्य फिरायचे व  दिवाळीत महाराष्ट्रातील एक पूर्ण जिल्हा. एक वर्ष असंच गेलं.मग म्हटले की,ह्या दिवाळीत तरी सीमोल्लंघन केलंच पाहिजे.ऑगस्टमध्ये चार दिवस गुजरातला मुक्काम करुन आलेलो पण घंटा कुछ देखा नही.असले सीमोल्लंघन काय कामाचे ना? खानदेशातून मुसंडी मारुन नर्मदेपार मध्यप्रदेशात चढाई करायचा विचार केला. देडे सर व किरण दोघे पण तयार झाले. मला सुट्टी नव्हती म्हणून दिवाळीच्या सुट्टीमध्येच कार्यभाग साधून घ्यायचा होता(uffff, yeh private job bhi na.) उत्तरेत नांदगावच्या(जि.नाशिक) वर गेलो नव्हतो कधी.त्यामुळे अंदाजावरच प्लॅन होता.गुगलकडून गरजेपुरती माहिती घेतली होती. 25 त...

रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस सहावा

Image
रायगड जिल्हा दर्शन मोहिम : दिवस सहावा आज सकाळी निवांत उठलो,सगळं निवांतच आवरले.महाडजवळचे सव येथील कुंड व गांधारपाले लेणी करुन निघणार होतो.पण मोहनने वाळेणकुंड बद्दल सांगीतले व आधी तिकडे निघालो. मी व मोहन एका गाडीवर आणि देडे सर व विलास(मोहनचा भाऊ) दुस-या गाडीवर. नदीच्या कुंडामध्ये(खोलगट भागात)खायला टाकल्यावर मोठाले मासे येत असतात,तेच पाहायचं होतं.रस्त्याच्या कडेला गाडी लावली व    उन्हाळ्यात कोकणातील इतर नद्यांप्रमाणे कातळखडक उघडे पडलेली कोरडीठक्क नदी पाहत होतो.(दोनच महिन्यांनी ह्या नदीचा पावसाळ्यातील फोटो whats appला पाहिला. भयानकच म्हणता येईल.) मग लोखंडी पूल ओलांडून देवीच्या दर्शनासाठी गेलो.खायला घेऊन गेलतो पण थोडं लेट झाल्यामुळे उन्हात मासे बाहेर येत नाहीत असं स्पष्टीकरण मोहन व विलासने दिले.मग फोटोसेशन करुन लेण्यांकडे मोर्चा वळवला.जाताना मोहनची खरवलीची जागा पाहिली. लेण्यांकडे जाण्यासाठी नवीनच बांधकाम केलेल्या दगडी पाय-या दिसत होत्या.लेण्या कोरीव नव्हत्या.गुंफा म्हणता येईल. काम अपूर्ण राहिलेलं असावं.लेणी पाहून  झाल्यावर मोहन म्हणला," सवला...