Posts

AllRounder

All Rounder असणं कधीकधी नुकसानकारक ठरतं... साला ,कळतंच नाय नक्की काय करावं ते. हे पण करु वाटते,ते पण करायचंय.

उनाडायची प्रेरणा

            लहानपणी शाळेत असताना वार्षिक सहली जायच्या.ब-याचदा बाहेरच्या जिल्ह्यातच जायच्या.आमची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की घरचे मला सहलीला पाठवू शकतील. फक्त सातवीला असताना एकदा सातारा- सांगली- कोल्हापूरला सहल गेलती तेव्हा गेलेलो.दहा वर्षात फक्त एकदा.सहलीवरुन आलेली मुले मजामस्तीचे अनुभव, पर्यटन स्थळाबद्दल सांगायचे.त्यांच्या आनंदात सहभागी होत असलो तरी माझ्या बालमनाच्या पटलावर "सहलीची खंत" टोचत राहायची आणि मग मी स्वतःला समजूत घालायचो की आपण खूप फिरायचे,जेवढे शक्य होईल तेवढे फिरायचे. गाडीवर /गाडीत बसलो की उतरुच नये असं वाटते. माझ्या फिरण्याच्या सवयीत एस.टी बसचा आणि पासचा खूप मोठा वाटा आहे.एसटी मध्ये खिडकी मिळवण्यासाठी मी लहान मुलांप्रमाणे धडपडत असतो.सॅकमध्ये शेजारी बसणा-यासाठी काही ना काही खाऊ ठेवतच असतो.मला लहान मुले व म्हाता-या माणसांसोबत गप्पा मारायला खूप आवडते.मुलांसोबत त्यांच्या छंद व करियर विषयक जाणून घ्यायला आवडते तर आजीआजोबा आपल्या मुल-नातवांबदल,शेतीबद्दल भडभडून बोलतात. समजा एखादा लयच 'बोअर' असेल तर कानात काॅड टाकून मस्त बाहेर डोकवायचे.मी ब-याचदा ख...

NDA

17 Sept 2016 सर्वाना विनंती की ट्रेनिंगसाठी आपल्या गावातून ये-जा करणारया NDAच्या विद्यार्थ्याना-सैनिकांना माणूसकीच्या दृष्टीकोनातून मदत करावी. काल रात्री आमच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या सैनिकांना  पाणी देऊ केलं रस्ता दाखवला... देशसेवा केल्याचं समाधान झालं. आज पहाटे 4.30 वा एक तुकडी गावातील एका माणसाला विनंती करित होती की आमच्यातील दोघे जण खूप दमलेले आहेत.इतके की त्याना चालणे अशक्यच आहे.एवढ्या ओझ्यासह त्यांना चालणे अवघड आहे.तुमच्या गाडीतून आम्हाला गोंधळवाडीला सोडा तिथे आमची गाडी आहे. पण हा माणूस घाबरला असावा उगाच मिलिटरीने आपली गाडी जप्त वगैरे केली तर?? ह्याने नकार दिला.त्यांनी सामानाची अदलाबदल केली त्या दोघांना 2-2खांदे दिले आणि पावसात पुढे चालू लागले.लाज वाटते आपल्या अशा वागणूकीमुळे त्याना नक्कीच प्रश्न पडला असेल आपण इतके खडतर कष्ट करतोय पण  कुणाला त्याची जाणच नाही कदरच नाही.अशा लोकांसाठी आपले कष्ट वाया तर नाही ना गेले?  खरंच विचार करा मित्रहो,मिसरुडही न फुटलेली घरादाराचा त्याग करुन भारताच्या कानाकोपरयातून देशसेवेसाठी आलेली ही मुलं.सणवार,ऊन- वारा-पाऊस काही बघत नाहीत.ते आ...

एक दिवस शाळेसाठी

13 Oct 2016 "एक दिवस शाळेसाठी" ह्या स्वयंघोषित उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात असलेल्या मुळशी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर झालो.(चांगल्या कामासाठी मुहूर्त लागत नाही कारण दसरा कधी आला नि गेला ते पण कळाले नाही.) परिपाठ झाल्यावर चौथीच्या वर्गावर इतिहास शिकवायला गेलो.पाहतो तर फक्त 8 विद्यार्थी.बहुधा फॅमिली प्लॅनिंग(strike rate कमी झाला) आणि इंग्लिश मिडियमचे फॅड ही कारणे असावीत.आमच्या वेळेस तर प्रत्येक वर्गात 40-45 जण तर हमखास असायचे(उगाच नाही भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसरया नंबरवर आहे.) शिवाजी महाराजांबद्दल मुलांना खूप कमी माहिती होती किंवा 10 वर्षाच्या मुलांकडून माझी अपेक्षा जास्त असावी. पुण्यामध्ये लालमहाल, सारसबाग, शनिवारवाडा आहे हे 8 विद्यार्थ्यांमध्ये फक्त एका मुलीला माहित होते. ते स्वतः राहत असलेल्या मुळशी तालुक्याविषयी त्यांना अक्षरशः काहीच माहिती नव्हती. चाॅकलेट खाल्यावर कागदाचे काय करता असे विचारले असता फेकून देतो असे 'नॅचरल'  उत्तर सर्वानी दिले. मग रस्त्यावरचा कचरा उचलू शकत नाही तर किमान कचरा तरी करणार नाही.यासाठी स्वतःचा कचरा स्वतःज...

उतारा

भोंदू-भगतांनी लिंबू-नारळ उतरवून टाकायला सांगण्याऐवजी लिंबाचा रस व नारळ पाणी पिऊन खोबरे खाऊन;  मग उरलेला लिंबू-नारळ उतरवायला  सांगितले असते ना, तरी लय जीव वाचले असते.

No -Broker

वेबसाईटचे नाव आहे No-Broker. पण Broker चीच खोगिरभरती जास्त आहे.

Horn

रस्ता; मग तो साधा असो वा हायवे वाजवलेला प्रत्येक हाॅर्न हा 'शिवी'सम  असतो.

पोस्टमन

काळ लय वाईट... आधी पोस्टमन घरी येऊन पत्र देत होता. आता पोस्टमनच्या घरी जाऊन पत्र आणावं लागतंय.

२ गुंठे

तेव्हा शासनाचा सॅटेलाईट जमीन मोजणी व Online 7/12 प्रकल्प प्रायोगिक तत्वावर मुळशी तालुक्यात सुरु झाला होता.नविन प्रकल्प असल्यामुळे तांत्रिक चुका होणारच,हे गृहित धरुन शासनाने हरकत निवारण केले जाईल, असे सांगितले होते.   यथासांग तलाठ्याने नविन कागदपत्रे दिली.बघतो तर काय 7/12वर  दुस-याचेच नाव लागलेलं. रितसर अर्ज केला व आमची नावे लावून घेतली.                  आता नव्याने पुन्हा आलेल्या 7/12वर चेक केलं तर 6.28एकर मधून 2गुंठे क्षेत्र गायब झालेलं. पुन्हा मंडल अधिका-याकडे अर्ज घेऊन गेलो. त्यांना म्हटले,"सर,मागच्या वेळेस मालक गायब केला.आता 2गुंठे जमीनच चोरीला गेली." ते म्हणाले,"बघू."7/12 दाखवला. ते म्हणाले," अरे,तुमची तर पावणे सात एकर जागा आहे.2गुंठ्याने काय एवढा फरक पडतो?" (पाहा कामचूकारपणाचे आणि चूक लपवण्याचे उदाहरण ) मी-सर, बांधाच्या एक एक फूटावरुन भावकी एकमेकांच्या जीवावर उठते आणि मी 2 गुंठे दुस-याला सोडू?? साहेब-तेही खरंच आहे म्हणा.बघू अर्ज. असं म्हणत त्यांनी अर्ज दाखल करुन घेतला.

#वपुर्झा

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, कधी माणसे तर कधी तंत्रज्ञान या चार गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो.

Bikini

दीपिका पदुकोणने हिरव्या रंगाच्या बिकिनीचे फोटो पोस्ट करुन वाद मिटवावा.

टेमघर

मुळशी तालुक्यातील टेमघर जलायशयाला(धरणाला)        " सरदार दयाजीराव मारणे जलाशय" असे नाव द्यावे,अशी माझी मनोमन इच्छा आहे.

Indian

We are Indians,Firstly & Lastly. पण ह्यामध्ये मग प्रत्येकाचा धर्म जात वर्ण लिंग भाषा प्रांतीय अस्मिता राजकीय पक्ष ह्यांचा प्रवेश होतो आणि कदाचित भारतात असल्यामुळे  आपण विसरुन जातो की, आपण भारतीय आहोत.

Sympathy

Practical माणसांना मनापासून Sympathy देता येत नाही.

18 ते 21

मुलीचे वय 18 वरुन 21वर्षे केलं.त्याबद्दल माझे मत : 1)आधी बाप असा विचार करायचा की, कधी मुलीचे वय 18 होतंय आणि मी तीचं लग्न लावून मोकळा होतोय. पण आता 21 वय केल्यावर  बाप पहिला असा  विचार  करेल की,"असं न् तसं 21वर्षे मुलीला घरात ठेवायचीये/सांभाळयचीये तर तिला किमान 12वी शिकवू व पुढेमागे कोर्स देऊ किंवा काॅलेज जवळ असेल तर 15वी शिकवूच." ह्याने काय होईल कि,हिमालयासारखा बाप मागे असेल तर मुली नक्कीच शिकतील.स्वतःचे ध्येय पूर्ण करतील. -मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल.मुली त्यांच्या घरातून गावातून नाही तर Comfort zone मधून बाहेर पडतील. 2)18वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न झालं पाहिजे हा  कायदा असूनही 15-16-17वर्षे वय असताना  कितीतरी बाललग्ने ग्रामीण भागात व मागास जातींमध्ये दिसून येतात. नविन सुधारणेने 21जाऊद्या  किमान 18-19पर्यंत तरी नक्कीच होतील.(मागील कायद्याचा बॅकलाॅग नविन सुधारणेने भरुन काढला, असे म्हणता येईल.) -18वय म्हणजे मुलगीच काय मुलीच्या बापाने पण 'जग बघीतलेलं नसेल'.त्यामुळे जरा त्यांना सामाजिक- व्यवहारिकदृष्ट्या Mature होऊद्या, बाहेरच्या जगाशी अपड...

आयुष्य

आयुष्य खूप सुंदर आहे ; फक्त ऑलिंपिकमध्ये Gold Medal  मिळाले पाहिजे.

शेतकरी

प्रत्येक शेतकरी बांधवांनी कृषिक्षित बनले पाहिजे.

ती एक रात्र

एप्रिल 2012 मधील घटना आहे ही. माझी B.Sc Third Year ची शेवटची परीक्षा होती.परीक्षा ज्या दिवशी संपत होती त्याच्या दुस-या दिवशी हेमंतच्या बहिणीचे लग्न होते. फक्त परीक्षाच नाही माझी काॅलेज लाईफ पण पण संपली होती. लग्नाच्या निमित्ताने रिफ्रेशमेंट मिळणार होती;नविन जिल्हा,नविन प्रदेश. ठरवले की लग्नाला जायचंच. हेमंत म्हणालेला की- पुण्यातून नांदगावला यायला 7 तास लागतात.लग्न सकाळी 11वाजता आहे.त्यामुळे तू आदल्या दिवशीच निघ. अलंकार पण निघणार आहे. पण तो रेल्वेने जाणार होता. मला रेल्वेपेक्षा एसटी मध्ये कंफर्ट व सेफ वाटते.त्यामुळे मी अलंकारला नाही म्हटले. आदल्या दिवशी मी बोटा या गावी माझ्या चुलत मामाच्या गावी मुक्काम करुन  एकूण प्रवासातले 3.30तास मी कव्हर करणार होतो व बाकी प्रवास दुस-या दिवशी करणार होतो. ह्या चुलत मामाकडे मी कधी गेलो नव्हतो.घरचे जाऊन आलेले होते.माझी त्यांच्याशी ओळख होईल म्हणून मी माझा मुक्काम बोट्याला करायचा ठरवले .घरचे बरेच दिवस झालेले बोट्याला जाऊन आलेले.त्यांना पण बरं वाटले की मी जातोय म्हटल्यावर.पप्पांकडून त्या दोन मामांचे फोन नंबर घेतले.बॅग वगैरे रात्रीच भरुन ठेवली. सकाळी उठू...

Via

जुलै २०१० मधील प्रसंग आहे हा. मी व माझा मित्र तुषार पौड(ता.मुळशी) पालीला देवदर्शनाला एसटीने गेलेलो.येताना रात्र झाली म्हणून भागाड(ता.माणगाव)ला चुलत्यांकडे मुक्कामी राहिलो.सकाळी  माघारी निघणार होतो पण चुलते म्हणाले,"ताईला चिपळूणला नर्सिंगच्या संस्थेत सोडून ये.तिथली व्यवस्था कशी आहे ते पाहा" तुषारला म्हटले जायचे का ? तो म्हणला जाऊत. मग ताई,काकू व आम्ही दोघे निघालो. माणगाववरुन चिपळूण गाडी मिळाली.अर्धी गाडी रिकामीच होती. महाड सोडले व मुसळधार पाऊस सुरु झाला.एसटी चा ड्रायव्हर सुसाट गाडी पळवत होता.मुळशीमध्ये राहून तुषारने असा पाऊस बहुतेक पाहिला नव्हता.त्याला भिती वाटली.तो जोराने ओरडला-'ड्रायव्हर, गाडी जरा हळू घ्या.'पण ड्रायव्हरला काय आवाज ऐकू गेला नाय. तो त्याच्याच धुंदीत.गाडी चिपळूणमध्ये आली. चिपळूणला तीन स्टँड आहेत हे पहिल्यांदाच कळाले.नक्की ती संस्था कुठे आहे माहित नव्हते.मग दोन नंबरच्या स्टँडला उतरण्याचा मध्यम मार्ग निवडला.गाडीतून उतरलो व मग रिक्षा करुन त्या संस्थेत आलो.जवळच होते.ताईचे बि-हाड ठेऊन तिचा निरोप घेऊन आम्ही माघारी आलो.बराच वेळ झाला महाड- माणगावला जाणारी गाडी ...

टक्कल

Image
टक्कल करण्याचे फायदे व तोटे : -आरश्यासमोर सारखे न्याहाळण्याचा वेळ कमी होतो. -डोकं एकदम हलकं होतं. -केस नसल्याने डोक्याचा सूर्यासोबत डायरेक्ट संपर्क येतो व डोकं तापते. -टोपीचा खर्च वाढतो व तीची काळजी लागून राहते. -सलूनमध्ये कटींगचा किमान दोन-तीन महिन्यांचा खर्च कमी म्हणजे शून्य इतका होतो. -कटींग साठी नंबर लावावे लागतात तो वेळ वाचतो.तिथे नंबर असल्यास  गप्पा मारताना होणा-या चहापाण्याचा खर्च पण कमी होतो.पण गल्ली ते दिल्ली चे analysis लवकर मिळत नाहीत. -केसांसाठीचा तेल,कंगवा,कंडीशनर, शाम्पू,साबण,जेल,डाय इ.खर्चात खूप मोठी बचत होते. -सासरवाडीला न जाण्यासाठी हे एक उत्तम कारण देता येते. -बायकांना आपल्या टकल्या नव-याला तरुण मुली आणि बायांची 'नजर' लागणार नाही,म्हणून निश्चिंत राहतात,तर टकल्यामुळे मुली -बाया पटायचे राहूद्या ढूंकून पण पाहणार नाहीत, याचे टेन्शन तमाम पुरुषांना असते. -चेहरा धुताना तो टकल्यावरुन मानेपर्यंत धूत आणावा लागतो. -मच्छरांना चावण्यासाठी एक नविन  निर्धोक प्लॅटफाॅर्म मिळतो. -स्वतःच्या टकल्यावर तबला वाजवण्याचा फील घेता येतो व दुस-यांनाही देता येतो. -खिशात कंगवा ठेवण्याची ग...